Chandrashekhar Bawankule .jpg Sarkarnama
विदर्भ

BJP News: महापालिका निवडणुकीत स्वबळ की महायुती..? बावनकुळेंच्या उत्तरानं अजितदादा अन् शिंदेंची धडधड वाढवली

Mahayuti On Local Body Election : अजित पवार आणि एकनाथ शिंदे स्वतंत्रपणे लढण्यात भाजपचा फायदा असल्याचे सांगण्यात येते. त्यांचे उमेदवार लढल्यास ते महाविकास आघाडीतील उद्धव सेना आणि शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडतील, असाही राजकीय अंदाज बांधला जात आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महापालिकेची निवडणूक आम्ही एकत्रितच लढणार असल्याचे दावे महायुतीचे नेते करीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचेसुद्धा हेच म्हणणे असले, तरी काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील, असे सांगून त्यांनी महायुतीबाबतच संभ्रम आणखी वाढवला आहे.

महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री झाल्यानंतर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती करायची किंवा नाही याचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवला जाणार असल्याचे सांगितले होते. राज्य पातळीवरून यात हस्तक्षेप केला जाणार नाही असेही स्पष्ट स्पष्ट केले होते. नागपूर शहर आणि महापालिकेची परिस्थिती बघता नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट होते.

नागपूरमधील भाजपच्या (BJP) एकाही नेत्याला महायुती नका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे नागपूरमध्ये फारसे अस्तित्व नाही. मागील निवडणुकीत शिवसेनेचे फक्त दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडून आला होता. आता हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. दोन गट पडले आहे. अजित पवार आणि शिंदे सेना यांच्याकडे एकही नगरसेवक नाही. जे निवडूण आले होते. ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटात कायम आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर शहरात भाजपने सर्व सहा जागा लाढल्या होत्या. त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडूण आले आहे. पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. लाखांच्या जवळपास त्यांनी मते घेतली आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आता महापालिकेची निवडणूक लढायची आहे.

मागील निवडणुकीत 150 पैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडूण आले होते. पराभूत झालेल्या प्रभागातही भाजपच्या उनमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. त्यामुळे या जागा मित्रपक्षाला सोडल्या जातील याची कुठलीच शक्यता नाही. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठे करण्याची जोखीम भाजप घेईल असे दिसत नाही.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे स्वतंत्रपणे लढण्यात भाजपचा फायदा असल्याचे सांगण्यात येते. त्यांचे उमेदवार लढल्यास ते महाविकास आघाडीतील उद्धव सेना आणि शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडतील, असाही राजकीय अंदाज बांधला जात आहे. हे सर्व बघता नागपूर महापालिका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT