Suresh Dhas Vs Walmik Karad : पेटलेल्या धस-मुंडे वादामागची मोठी धक्कादायक अपडेट; वाल्मिक कराडची आष्टीतून लढण्याची तयारी...?

Suresh Dhas Dhananjay Munde Walmik Karad : गेल्या दोन महिन्यांपासून पेटलेल्या भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या टोकाच्या वादापाठीमागचं खरं कारण समोर आलं आहे.
 Suresh Dhas Dhananjay Munde Walmik Karad (1).jpg
Suresh Dhas Dhananjay Munde Walmik Karad (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्येनं महाराष्ट्राचं राजकारण चोहोबाजूंनी ढवळून निघालं. यात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह एकूण नऊ जणांवर मकोका लावण्यात आला. पण कराडचं मुंडे कनेक्शन धागा पकडून भाजप आमदार सुरेश धसांनी (Suresh Dhas) एकामागोमाग एक बीड,परळीतील गुन्हेगारी प्रकरणं बाहेर काढले. या आरोपांमुळे आका, आकाचा आका असा उल्लेख करत मुंडेंना जेरीस आणलं. पण मुंडे-धस वादामागं वेगळंच धक्कादायक कारण समोर असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पेटलेल्या भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या टोकाच्या वादापाठीमागचं खरं कारण समोर आलं आहे. यात वाल्मिक कराडनं बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.

तसेच हा मतदारसंघ हा सुरेश धस यांचा बालेकिल्ला समजला जातो.याच मतदारसंघातून सुरेश धस यांनी अनेकदा आमदारकी मिळवली आहे.पण याच मतदारसंघातलं वंजारी समाजाचं वाढतं प्राबल्य लक्षात घेऊन वाल्मिक कराडनं येथूनच निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. पण महायुती निवडणुक लढवण्याचा निर्णय झाल्यामुळे या मतदारसंघातून सुरेश धस यांना तिकीट मिळालं. आणि धस हे मोठ्या मताधिक्क्यानं जिंकूनही आले.

 Suresh Dhas Dhananjay Munde Walmik Karad (1).jpg
Trupti Desai : वाल्मिक कराड देखील आजारी, धसांनी त्याचीही जेलमध्ये भेट घ्यावी, तृप्ती देसाईंचा खोचक सल्ला

भाजप आमदार सुरेश धस यांच्या हाच राग मनात असल्याचं बोललं जात आहे. तसेच आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्या पत्नीच्या नावानं अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला असला तरी तो कराडच्या सांगण्यावरुन झाला असल्याचा संशय धस यांना होता.म्हणून धस-मुंडे वादानं टोक गाठलं असल्याची मराठवाड्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. बोलले जात आहे.

भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची दोनवेळा गुप्त भेट झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धस आणि मुंडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या भेटींचं समर्थन केलं आहे.

 Suresh Dhas Dhananjay Munde Walmik Karad (1).jpg
BJP Vs AAP : मोठी बातमी! विधानसभेनंतर भाजपचा केजरीवालांना पुन्हा दिल्लीत धक्का; 'आप'च्या 3 नगरसेवकांनी साथ सोडली

भेटीबाबत विचारलं असता अजित पवार संतापले, आणि कोण कोणाला भेटला,तर तुला काय वाईट वाटतं असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकारांनी केला. तसेच सुरेश धस हे आमदार आहेत आणि या महाराष्ट्राला यशवंतराव यांची शिकवण आणि सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळे कोणी कोणाला भेटलं तर त्यात काही वावग नसत कोणी कोणाचा दुश्मन नाही, असंही पवार म्हणाले.

आमची महायुती होण्यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील यांना मी भेटायचो. आता आमची विचारधारा एक झाली आहे . सुरेश धस यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे आजारी असल्याने धस हे धनंजय मुंडे यांना भेटायला गेले असतील. जर तुम्ही आजारी पडला तर सहकारी पत्रकार म्हणून माणुसकीच्या नात्याने तुम्हाला पण भेटायला येतात ना, असा सवाल त्यांनी पत्रकारांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com