Sudhir Mungantiwar, Nitin Gadkari and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या स्टार प्रचारकांमध्ये विदर्भातून गडकरी, फडणवीस, मुनगंटीवार !

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : ‘चारसौ पार’चा नारा देत भाजप नेते लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भात १९ एप्रिलला मतदान असल्याने सध्या राज्यस्तरीय नेत्यांचा भर विदर्भावर आहे. दरम्यान, महायुतीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली. यामध्ये विदर्भातून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची पहिली यादी प्रकाशित केली आहे. यादीत महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 20 प्रचारकांची नावे देण्यात आली आहे. देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 1 जून रोजी अंतिम व सातवा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. भाजपने या वेळी 400 पारचा नारा दिला आहे. त्यातच आता भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे स्टार प्रचारक संपूर्ण देशात दौरा करणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे.

अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, विष्णुदेव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, शिवराजसिंह चौहान, सम्राट चौधरी, अशोक चव्हाण, विनोद तावडे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे, पीयूष गोयल, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, के. अन्नामलाई, मनोज तिवारी, रवीकिसन, अमर साबळे, विजयकुमार गावित, अतुल सावे, धनंजय महाडिक यांचा समावेश प्रचारकांच्या यादीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीने एकूण 40 स्टार प्रचारक जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्राच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात वर्णी लागल्याचे दिसून येते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी ही यादी जाहीर केली आहे.

चार कोटी मतदारांचे लक्ष्य...

राज्यात 45 पारचा नारा देत भाजपने जोरदार प्रचार मोहीम आखली आहे. राज्यात प्रचार सभांचा धुरळा उडणार आहे. याला नमो ‘संवाद सभा’ असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील जवळपास 4 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य भाजपने डोळ्यांपुढे ठेवले आहे. यासाठी देशातील जवळपास 300 वक्त्यांची फौज तैनात केली जाणार आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान असल्याने तेथे प्रचार मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे. मोदी यांच्या कार्यकाळाच्या आधीचा देश व मोदींच्या कार्यकाळातील देश यावर लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. देशातील सर्व वर्गासाठी सरकारने काय केले, याचा पाढा वाचला जाणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT