Sudhir Mungantiwar : वनमंत्री पुन्हा ठरले विक्रमवीर; जागतिक पातळीवर आणखी एका ‘रेकॉर्ड’ची नोंद

Tadoba Festival : चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. वनमंत्र्यांच्या संकल्पनेतून 65 हजार 724 रोपट्यांपासून निर्मिती
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar : आपल्या कार्यशैलीतून वेगवेगळे विक्रम नोंदविणारे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पुन्हा एकदा विक्रमवीर ठरले आहेत. महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत असताना आता वन विभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले आहे. या विभागाने 65 हजार 724 रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करीत हा विक्रम केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र वन विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

चंद्रपूर येथे वन विभागाच्या ‘ताडोबा महोत्सव 2024’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द साकारण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा ‘टास्क’ अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार चंद्रपुरातील रामबाग येथे ही कलाकृती साकारण्यात आली. 26 प्रजातींच्या तब्बल 65 हजार 724 रोपट्यांचा यासाठी वापर करण्यात आला. त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. महाराष्ट्राच्या वन विभागाने आतापर्यंत चार लिमका रेकॉर्ड केले आहेत. मात्र, प्रथमच राज्याच्या वन विभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुधीर मुनगंटीवार यांनी पाठ थोपटली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar : वाघ नखानंतर मुनगंटीवार यांचा 'दांडपट्ट्यां'नी वार

वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिप गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकर, वन अधिकारी प्रशांत खाडे, मिलिंद वेर्लेकर आदींच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील या विश्वविक्रमाची नोंद झाली. ग्रीन भारतमातेच्या शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वन विभागाने चांगले उद्यान त्वरित साकारावे. मिळालेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे, अशा सूचना आता वन विभागाला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या उद्यानातील रोपट्यांची रचना ‘भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे असणार आहे.

सुधीर मुनगंटीवार आणि रेकॉर्ड हे समीकरणच आता महाराष्ट्राच्या राजकारणात झाले आहे. यापूर्वी अयोध्या येथे राम मंदिराचे लोकार्पण असताना चंद्रपुरात ‘सीयावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांचा रेकॉर्डदेखील करण्यात आला होता. काम सरकारी असो किंवा पक्षाचे ते इतक्या भव्यदिव्य स्वरूपात करावे की, त्याचा एक विक्रमच स्थापन व्हावा, असा आग्रह सुधीर मुनगंटीवार यांचा नेहमीच असतो. त्यामुळेच कदाचित कधी नव्हे ते चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे अलीकडेच शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली. राज्याची वन अकादमी चंद्रपुरात झाली. राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल सैनिक स्कूलही याच गावात साकारली गेली. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा-अंधारी प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या ‘एआय अलर्ट सिस्टिम’चा मन की बातमध्ये उल्लेख केला.

Edited By : Prasannaa Jakate

R

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar on Reservation : अर्धा डझन मराठा मुख्यमंत्री झाल्यावरही ओबीसी नेत्यांच्या दोषाचा प्रश्नच कुठेय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com