Prakash Ambedkar and VBA Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election: रामटेकपाठोपाठ वंचितने आणखी एका मतदारसंघातील उमेदवार बदलला

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष विविध मतदारसंघांतून आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहे. मात्र, काही पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अचानक उमेदवारांची अदलाबदल केल्याचं पाहायला मिळत आहे. काल शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने हिंगोलीतील आपला उमेदवार बदलला तर वंचितने (VBA) रामटेकमधून थेट निवडणुकीतून माघार घेतली, तर वंचितने आणखी एका मतदारसंघातील आपला उमेदवार बदलला आहे. (Yavatmal-Washim Lok Sabha)

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) यवतमाळ-वाशीम (Yavatmal) लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. सुभाष हेमसिंग पवार यांच्याऐवजी आता येथून अभिजित लक्ष्मणराव राठोड (Abhijit Laxmanrao Rathod) यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, अशातच वंचितने आपला उमेदवार अचानक बदलल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काल वंचितचे रामटेकचे (Ramtek) अधिकृत उमेदवार व भाजपचे बंडखोर शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारण देत निवडणुकीतून माघार घेतली, तर वंचितने रामटेकमधील काँग्रेसचे (Congress) बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आधी जाहीर केलेल्या उमेदवारांची उमेदवारी का बदलली जात आहे, असा प्रश्न वंचितच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचित बहुजन आघाडीने आत्तापर्यंत उमेदवारांच्या तीन यादी जाहीर केल्या आहेत. वंचितने उमेदवारी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचादेखील उल्लेख केला आहे. पहिल्या यादीत आठ मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्या यादीत 11 उमेदवार जाहीर केले आणि तिसऱ्या यादीत 5 उमेदवारांची नावे जाहीर केली होती, तर त्यांनी कोल्हापूर आणि नागपूर येथील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर दिला होता.

दरम्यान, वंचितने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेआधी आपल्या काही उमेदवारांची अदलाबदल केली आहे. यामध्ये वतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष हेमसिंग पवार (Subhash Hem Singh Pawar) यांच्याऐवजी आता अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवीन उमेदवारी जाहीर झालेले अभिजित राठोड हे आज यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

राठोड हे वाशीमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी आहेत. ते वंचितमध्ये कारंजा मानोरा विधानसभा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. सुभाष पवार यांनी प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे राठोड यांना ही उमेदवारी दिल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, आधी रामटेक आणि आता वाशीम-यवतमाळमधील उमेदवार अचानकपणे का बदलले, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT