Lok Sabha Election 2024: राज्यात बसपाच्या मतदानाची टक्केवारी घटली; अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड

Nagpur Lok Sabha Election 2024: बसपाला कॅडरबेस पक्ष म्हटलं जातं. उत्तर प्रदेशात एकेकाळी बसपच्या हातात सत्ता होती. या सत्तेचा परिणाम नागपूरसह महाराष्ट्रात दिसून आला होता. नागपूर महानगर पालिकेत बसपचे नगरसेवकही निवडूण आले होते.
BSP
BSPSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Lok Sabha Election 2024: बहुजन समाज पार्टीकडे (BSP) काँग्रेस आणि भाजपला (Congress And BJP) पर्यायी पक्ष असल्याचे सांगितले जायचे. परंतु, मागील दोन दशकांची आकडेवारी बघता बसपाचा वर चढलेला आलेख हळूहळू खाली येताना दिसत आहे. नागपूर लोकसभेत बहुजन समाज पार्टीने 1 लाख 18 हजार तर रामटेक लोकसभा मतदार संघात 95 हजारापर्यंत मजल मारली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत मतदानाचा हा आकडा निम्म्याच्याही खाली आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बसपाला कॅडरबेस पक्ष म्हटलं जातं. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एकेकाळी बसपच्या हातात सत्ता होती. या सत्तेचा परिणाम नागपूरसह (Nagpur) महाराष्ट्रात दिसून आला होता. नागपूर महानगर पालिकेत बसपचे नगरसेवकही निवडूण आले होते. इतकचं नव्हे तर मागील काही लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीतही त्यांना चांगली मत मिळाली होती. परंतु आता त्यांच्या मतांचा आलेख घटताना दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर लोकसभेचा विचार केल्यास 2004 नंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये दुप्पट वाढ झाली. माणिकराव वैद्य यांनी 1 लाख 18 हजार 741 मतं मिळवली होती. हा बसपाचा सर्वात मोठा आकडा आहे. त्यांनतर त्यांच्या मतांची संख्या कमी होत गेली. गेल्या निवडणुकीत जवळपास एक चतुर्थांश मतं त्यांना मिळाली. या निवडणुकीत बसपा उमेदवाराबाबत विविध चर्चाही रंगल्या होत्या. रामटेकमध्येही (Ramtek) अशीच स्थिती आहे. 2004, 2009 व 2014 चा विचार केल्यास मतांची वाढ होती. 2014 मध्ये किरण पाटणकर यांनी 9 हजार 51 मते घेतली होती. परंतु मागील निवडणुकीत हा आकडा निम्म्यावर आल्याचं दिसून आलं.

BSP
Lok Sabha Election 2024 : ...अन् भाजपची संधी हुकली, रामटेकचा गड शिवसेनेकडेच; काँग्रेस झेंडा फडकविणार का?

नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) 2 निवडणुकांमध्ये बसपचे 10 नगरसेवक निवडूण आले होते. किशोर गजभिये उत्तर नागपूर विधानसभा मतदरासंघाचे उमेदवार असताना ते विजयाच्या जवळ पोहचले होते. मायावती (Mayawati) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हापासून महाराष्ट्राच्या विधानसभेत खाते उघडण्याचे भरपूर प्रयत्न झाले. वेगवेगळ्या पक्षातील नाराज व सक्षम उमेदवारांना पक्षात आणून त्यांनी उमेदवारी दिली. मात्र बसपला अद्यापही महाराष्ट्रात खाते उघडण्यात यश आलेलं नाही. शिवाय आता त्यांना असणारा जनाधारही घसरत चालला असून बसपाच्या अस्तित्वासाठी ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

BSP
Lok Sabha Election: गोंदियातील आठ गावांचं पक्क ठरलंय; 'या' कारणामुळे मतदान करणार नाही म्हणजे नाही...!

बसपाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे

नागपूर लोकसभा

2019 महोम्मद जमाल 31725

2014 मोहन गायकवाड 96433

2009 माणिकराव वैद्य 118741

2004 जयंत दळवी 57027

रामटके लोकसभा

2019 सुभाष गजभिये 44227

2014 किरण पाटणकर 95051

2009 प्रकाश टेंभूर्णे 62238

2004 चंदनसिंह रोटेले 55442

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com