Balu Dhanorkar, Pratibha Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Constituency: मैं शेरनी हूं एक जिगर वाले की! प्रतिभाताई बाळू धानोरकरांचा गड राखणार...

Chandrapur Lok Sabha 2024 Results LIVE Pratibha Dhanorkar Vs Sudhir Mungantiwar: काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसच्या पंजाचा करिष्मा दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा सुरुवातीचा कल काँग्रेसच्या बाजूने आहे.

Jagdish Patil

Chandrapur Lok Sabha 2024 Results LIVE: काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसच्या पंजाचा करिष्मा दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा सुरुवातीचा कल काँग्रेसच्या बाजूने आहे. सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर या तब्बल 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे आता धानोरकर काँग्रेचा गड कायम राखण्याची शक्यता आहे.

प्रतिभा धानोरकर यांचे पती दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकरांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. अर्थात जिगरबाज बाळू धानोरकरांच्या पावलांवर पाऊल ठेवत प्रतिभाताईंनी हा मतदारसंघ सांभाळला आणि वाढवला. म्हणजे प्रतिभाताईंची ही झेप 'मैं शेरनी हूं एक जिगर वाले की' अशीच आहे.

प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर असल्या तरी अंतिम निकालानंतर या मतदारसंघातून कोण विजयी होणार याचं चित्र स्पष्ट होण्यासाठी अंतिम निकालाती प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडल्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला (BJP) धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आली होती.

या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर या आघाडीवर, तर भाजपचे उमेदवार तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर राहण्याचा अंदाज वर्तवला होता. हेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती.

मात्र त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात त्यांच तोडीचे उमेदवार म्हणून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून धानोरकर आणि मुनगंटीवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT