Ramtek Lok Sabha 2024 Results LIVE: रामटेकमध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसचा खासदार होणार? श्यामकुमार बर्वे तब्बल 'इतक्या' मतांनी आघाडीवर

ShyamKumar Barve Lok Sabha 2024 Results LIVE: रामटेक मतदारसंघातून सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या कृपाल तुमाने यांना डावलून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
ShyamKumar Barve
ShyamKumar Barve Sarkarnama

Ramtek Lok Sabha Election Result 2024 Live: काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना झालेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघांतून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या मतमोजणीचा कल महाविकास आघाडीच्या बाजून असल्याचं दिसत आहे.

रामटेक मतदारसंघातून सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या कृपाल तुमाने यांना डावलून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. पारवे यांची उमेदवारी शिंदे गटाला पसंत पडली नसल्याच्या चर्चा सुरुवातीपासून सुरु होत्या. त्यामुळे ही निवडणूक पारवे यांच्यासाठी कठीण जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता रामटेक मतदारसंघातील मतमोजणीचा सुरुवातीचा कल पारवे यांच्या विरोधात असल्याचं दिसत आहे.

या मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे (Congress) श्यामकुमार बर्वे आघाडीवर असले तरीही या मतदारसंघातून कोण विजयी होणार हे आत्ताच सांगता येणार नाही. कारण फायनल निकालाचं चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून चर्चेचा ठरला आहे. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे याचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे ऐनवेळी त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरावं लागलं.

ShyamKumar Barve
Prataprao Jadhav Lok Sabha 2024 Results LIVE : बुलडाण्यातून शिंदेंचा शिलेदार आघाडीवर...

तर बर्वेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार पण राजू पारवे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. त्यामुळे इथे शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडीतील मित्रपक्षांनी चांगली साथ दिल्याचं पाहायला मिळालं. सध्या काँग्रेसचे बर्वे आघाडीवर असले तरीही रामटेकचा गड कोण जिंकणार हे मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्याशिवाय सांगता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com