Bhavana Gawali CM Eknath Shinde
Bhavana Gawali CM Eknath Shinde  sarkarnama
विदर्भ

Bhavana Gawali : 'एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता', भावना गवळी राजश्री पाटलांच्या पराभवानंतर 48 तासांनी बोलल्या

Roshan More

Lok Sabha Election Result : वाशिम यवतमाळ मतदारसंघातून भावना गवळी यांना तिकीट नाकारत राजश्री पाटील यांना देण्यात आले होते. मात्र, ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. महायुतीला देखील चांगले यश मिळाले नाही. या निकालानंतर तब्बल 48 तासांनी 'जनतेच्या इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाल्या नाहीत. सत्य हे कटू असते पण ते बोललं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने प्रेशर होते.' असे भावना गवळी म्हणाल्या आहेत.

जनतेने कौल दिला आहे. तो स्वीकारला पाहिजे. एकमेकाला दोष देऊन काही फायदा नाही. पुन्हा हातात हात घालून काम करायला पाहिजे, असे देखील भावना गवळी बोलल्या. आपल्याला तिकीट न मिळण्या मागे स्क्रिप्ट होती, असा देखील अप्रत्यक्ष दावा गवळी यांनी केला.

'हेमंत पाटील यांनी देखील हे मान्य केलं की स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे. जेव्हा स्क्रिप्ट लिहिली जाते तेव्हा ती पक्षाच्या हिताची नसते. मला तिकीट देण्याची तळमळ मुख्यमंत्री शिंदे यांची होती. मात्र त्यात अनेक फॅक्टर झालेत असे दिसते, असा दावा देखील भावना गवळी यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde यांच्यावर प्रेशर होते असे म्हणत आपल्याला तिकीट न मिळण्यामागे भाजप तसेच स्क्रिप्ट लिहणारा नेता असल्याचे भावना गवळी यांनी अप्रत्यक्ष सांगितले. तसेच आपण फक्त एका जिल्हा पुरते मर्यादित नसून विदर्भातील तीन ते चार जिल्ह्यासांठी शिवसेना नेता म्हणून काम करणार असल्याचे गवळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT