Lok Sabha Election : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याचे पत्र काल जाहीर करण्यात आले. अन् चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील समविचारी पक्षांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दोन्ही जिल्ह्यांत वंचित बहुजन आघाडीची ब-यापैकी ताकद आहे. याचा फायदा येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. काही जागांवर तर वंचितचे उमेदवार निवडूनही येऊ शकतात, अशी परिस्थिती आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील महाविकास आघाडी व वंचितच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे अशीच भूमिका होती. त्यादृष्टीने आता एक पाऊल पुढे गेल्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांत कमालीचा उत्साह बघायला मिळत आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे. राजकीय गणीत जुळवण्याची ताकद त्यांच्यात आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली मतं लक्षणीय ठरली. त्यांच्या मतांचा फटका काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर बसला होता.
चंद्रपूर लोकसभेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर निवडून आले होते. पण त्यांचे मताधिक्य फार जास्त नव्हते. याच निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने लाखाहून अधिक मते घेतली होती. विधानसभेच्या निवडणुकांतही वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते लक्षणीय ठरली होती. वंचितने उभे केलेल्या उमेदवारांमुळेच काँग्रेसचे मातब्बर नेते पराभूत झाले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील हे चित्र बघता वंचितचा थेट फायदा भाजपला झाला, असे मत वंचितच्या कार्यकर्त्यासोबतच आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी व्यक्त केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुरोगामी विचारांना बळकटी मिळावी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाही याचा फायदा व्हावा, असे मत सर्वसामान्य आंबेडकरी कार्यकर्त्याकडून व्यक्त केले जात होते. आता निवडणुकांचे सत्र सुरू होणार आहे. देशासह राज्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये व त्याचा फायदा भाजपला कुठल्याही परिस्थितीत होऊ नये, यासाठी सर्व समविचारी शक्तींनी एकत्र येण्याचा सुर उमटला होता. काल (ता. ३०) मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकासमध्ये करण्यात आल्याचे अधिकृत पत्र जाहीर झाले. आता कार्यकर्त्यात चांगलाच उत्साह निर्माण झाला आहे.
'यांचे' स्वप्न भंगणार...
येणा-या विधानसभा निवडणुकीकरिता अनेकांनी आमदारकीची स्वप्न रंगविली आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरापासून कामांना सुरुवातदेखील केली आहे. आपल्या पक्षाकडून तिकीट मिळाली नाही तर वंचित बहुजन आघाडीची तिकीट घेऊन निवडणुकीत उभे राहण्याचे स्वप्न अनेकांनी बघितले होते. पण आता वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.