Lok Sabha Election Voting Percentage Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election Voting Percentage : नागपुरात 'या' आमदारांच्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 'इतकी'...

Sachin Deshpande

Vidarbha News : लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात मतदारांनी मतदान करण्यास टाळल्याचे चित्र सायंकाळी 5 पर्यंत होते. मतदानाची टक्केवारी घसरल्याचे वृत्त समजताच भाजप नेत्यांनी लगेच बूथ आणि इतर ठिकाणी गाठीभेटी घेत मतदारांना बाहेर काढण्याच्या हालचाली केल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यात सायंकाळ 5 पर्यंत मतदानाची टक्केवारी म्हणावी तशी न वाढल्याने ही परिस्थिती भाजप नेत्यांवर आली आहे. नागपुरातील भाजप आमदार व नेत्यांनी मतदानाची टक्केवारी वाढीसाठी नेमके काय केले, असा प्रश्न विचारला जात आहे. (Latest Marathi News)

राज्यात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी म्हणावी तशी समाधानकारक नव्हती. पाचही लोकसभा मतदारसंघांत सरासरी 54.85 टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. नागपूर येथे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. नागपूर येथे एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ टक्के तर नागपूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळ 5 वाजेपर्यंत सरासरी एकूण 47.91 टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील नागपूर मध्य 44.60 टक्के ( आ. विकास कुंभारे , भाजप ), नागपूर पूर्व 51.17 टक्के ( आ.कृष्णा खोपडे, भाजप) , नागपूर उत्तर 43.47 टक्के ( आ. नितीन राऊत, काँग्रेस) , नागपूर दक्षिण 47.93 टक्के (आ. मोहन मते, भाजप) , नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 51.00 टक्के (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप), नागपूर पश्चिम 49.04 टक्के (आ. विकास ठाकरे, काँग्रेस) मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामटेक मतदारसंघात 52.38 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्राने उमेदवार बदलण्याची वेळ काँग्रेसवर आली होती. या मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्याशी थेट लढत श्यामकुमार बर्वे यांच्याशी आहे. रामटेक मतदारसंघात एकूण 20 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत, तर एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. रामटेक 59.26 टक्के (आ.आशिष जयस्वाल, अपक्ष), यात काटोल 53.85 टक्के (अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस), सावनेर 51.38 टक्के (रिक्त), हिंगणा 41.80 टक्के (आ.समीर मेघे, भाजप), उमरेड 60.74 टक्के (रिक्त), कामठी 52.48 टक्के (आ.टेकचंद सावरकर,भाजप) मतदान झाले आहे.

गडचिरोली - चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात आहे. प्रमुख लढत ही भाजप उमेदवार अशोक नेते व काँग्रेस उमेदवार डाॅ. नामदेव किरसान यांच्यात आहे. एकूण 16 लाखांपैकी किती मतदार मतदानाचा अधिकार वापरतात हे पाहण्यासारखे असेल. गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव 64 टक्के, आरमोरी 65 टक्के, गडचिरोली 65 टक्के, अहेरी 63 टक्के, ब्रम्हपुरी 67 टक्के आणि चिमूर 64 टक्के मतदान झाले. सरासरी 65 टक्के मतदान सायंकाळ 5 वाजेपर्यंत झाले.

राज्यात गेल्या निवडणुकीत चंद्रपूर (Chandrapur) लोकसभा मतदारसंघात फक्त काँग्रेस विजयी झाली होती. पण, सुरेश उपाख्य, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. जवळपास 18 लाख मतदार या मतदारसंघात आहेत, तर एकूण 15 उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर 48.20 टक्के, राजुरा 59 टक्के , बल्लारपूर 59 टक्के , वरोरा 58 टक्के, वणी 59 टक्के, आर्णी 50 टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे.

R

भंडारा गोंदिया लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे यांची थेट लढत डाॅ. प्रशांत पडोळे यांच्यासोबत आहे. या मतदारसंघात एकूण 18 लाख मतदार आहे. तर एकूण 18 उमेदवार रिंगणात आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात तुमसर 59 टक्के , भंडारा 57 टक्के, साकोली 59 टक्के, अर्जुनी मोरगाव 54 टक्के, तिरोडा 57 टक्के, गोंदिया 56 टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT