अमरावतीत थापाड्यांची आणि खोटारड्यांची लंका जाळायला आलो आहोत. आजपर्यंत यांची थेरं खूप पाहिली. अमरावती ( Amravati ) मतदारसंघ शिवसेनेचा ( Shivsena ) बालेकिल्ला आहे. मला खात्रीय की अमरावतीतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचा कट्टर शिवसैनिक कधीही गद्दाराला साथ देणार नाही, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आहे.
अमरावतीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे ( Balvant Wankhede ) यांच्या प्रचारार्थ मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), काँग्रेस नेते मुकुल वासनिक, माजी मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ), माजी मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, "अमरावतीत थापड्यांची आणि खोटारड्यांची लंका जाळायला आलो आहोत. आजपर्यंत यांची थेरं खूप पाहिली. यशोमती ठाकूरांनी ( Yashomati Thakur ) म्हटलं की तुमची इकडे लढण्याची गरज नाही. आम्हीच त्यांचा ( राणा दाम्पत्य ) बंदोबस्त करू. पण, मला खात्रीय की अमरावतीतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक कधीही गद्दाराला साथ देणार नाही. अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिवसेना समोरून वार करते, मागून वार करणारी औलाद आमची नाही. आमची छातीवर वार झेलणारे आणि समोरून वार करणारे आहोत."
"मी नरेंद्र मोदींना तत्कालीन पंतप्रधान म्हणतो कारण, त्यांची 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. निवडणुकीच्या काळात कोणी पंतप्रधान नसते. ते काळजीवाहू पंतप्रधान असतात. पण, पंतप्रधान भाजपची काळजी वाहत आहेत. त्यामुळे ते काळजी वाहू आहेत. शिवसेना आणि भाजपची युती असताना पंतप्रधान महाराष्ट्रात किती सभांसाठी आले होते? आणि आता किती येत आहेत. पंतप्रधान मोदी प्रत्येक गल्लीबोळात प्रचारासाठी जात आहेत. दरवेळी जातीचं पिल्लू सभेतून सोडत आहेत," अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली आहे.
"रविवारी कुठल्यातरी सभेत पंतप्रधान म्हणाले, 'ज्यांना जास्त मुलं होणार, त्यांना काँग्रेस सगळी संपत्ती वाटून टाकेल.' 10 वर्षे मोदी पंतप्रधानपदावर होते. मग, कमी मुले होणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाही. जास्त आणि कमी मुलं कोणाला होतात, हे मोदींना कसं कळतं देव जाणे. त्यांच्याकडे यंत्रणा असेल, कारण ते पंतप्रधान आहेत," असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.