Uddhav Thackeray News : 'जय भवानी' शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आयोगाच्या नोटीसीला ठाकरेंकडून केराची टोपली

Uddhav Thackeray On Election Commssion : देवांच्या नावावर मते मागणाऱ्या मोदी आणि शहांवर आधी कारवाई करावी, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी आयोगाला दिलं.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) नवीन मशाल प्रचार गीतामधून 'हिंदू धर्म' आणि 'जय भवानी' हे शब्द काढून टाकावे, अशी नोटीस निवडणूक आयोगानं ( Election Commission ) दिल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. तसेच, पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. ते 'मातोश्री'वर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, "आमचं नवीन मशाल प्रचारगीत महाराष्ट्रासमोर प्रदर्शित झालं. पण, निवडणूक आयोगाकडे हे गीत गेल्यावर त्यातील दोन कडवे काढायला लावले आहेत. त्यातील एक 'हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे तुझे मर्म, जीवन कर त्यासी तू बहाल,' हे कडवं आहे. यामधील 'हिंदू' हा शब्द निवडणूक आयोगानं काढायला लावला आहे. पण, मी 'हिंदू' धर्म सोडल्याची टीका करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे. त्यांनी सांगावं 'हिंदू' धर्म हा शब्द काढायला लावणं योग्य आहे का? आम्ही कुठेही 'हिंदू' धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही. आम्ही 'हिंदू' धर्म सोडलं हे आवाई उठवणाऱ्या आणि चाकर असलेल्या निवडणूक आयोगानं याचं उत्तर दिलं पाहिजे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी, 'बजरंगबली की जय' म्हणत बटन दाबा असं आवाहन केलं होतं. तर अमित शाह यांनी 'मते द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडवू,' असं म्हटलं होतं. पण, गेली कित्येक वर्षे 'जय भवानी, जय शिवाजी,' ही घोषणा जनतेच्या मनात आहे. जर, मोदी आणि शाहांना तुम्ही देवांच्या नावावर मते मागण्याची परवानगी देत असाल; तर उद्या आम्ही 'हर हर महादेव,' 'जय भवानी आणि जय शिवाजी,' म्हटल्यावर आयोगाला आक्षेप असता कामा नये," असा शब्दांत ठाकरेंनी खडसावलं आहे.

"मशाल गीतामध्ये 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा आहे. त्यातील 'जय भवानी' हा शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगानं फतवा पाठवलेला आहे. आम्ही 'जय भवानी' हा शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगानं आमच्यावर कारवाई करण्यापूर्वी मोदी, शहांवर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या कुलदैवतांचा अपमान केल्याचा आरोप मी केल्यावर निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे का?" असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
Devendra Fadnavis News : "भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर दिलं जाईल", फडणवीसांचा ठाकरेंना थेट इशारा

"हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवतांचा अपमान आहे. महाराष्ट्राबद्दल आकस राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसत आहे. महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष नसनसात ठासून भरलेला आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. ही हुकूमशाही चालणार नाही. आम्ही लढाई लढतो आहोत. कोणत्याही परिस्थितीत 'जय भवानी' हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करण्यापूर्वी मोदी आणि शहांवर कारवाई करावी," असं आव्हान उद्धव ठाकरेंनी आयोगाला दिलं आहे.

Uddhav Thackeray
Chandrasekhar Bawankule : 'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर..' ; उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com