Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil deshmukh : काका-पुतण्यातील वाद पेटणार; 'भगोडा आमदार' म्हणत डिवचले

Rajesh Charpe

Anil Deshmukh News : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा लागली असून एकमेकांचे उट्टे काढले जात आहे. वैयक्तिक हल्लेसुद्धा केले जात आहे.

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काका-पुतण्यामध्ये वादाला सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी तसेच भाजपचे संभाव्य उमेदवार, माजी आमदार आशिष देशमुख यांचा चक्क ‘भगोडा आमदार' असा उल्लेख केला. तसेच आशिष देशमुख यांच्या निष्ठेवरही शंका व्यक्त केली.

आमदार अनिल देशमुख यांना 2014 च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी पराभवाचा धक्का दिला होता. तेव्हापासून देशमुख कुटुंबामध्ये चांगलाच वाद सुरू झाला होता. आशिष देशमुख यांचे भाजपच्या नेत्यांसोबत फार काळ पटले नाही. आशिष देशमुख यांनी मोदी यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे सुरू केले.

स्वतंत्र विदर्भाबाबात फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भूमिका जाहीर करावी, अशी उघड मागणी आशिष देशमुख यांनी केली होती. काटोलमध्ये उपोषणसुद्धा सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना आमदार आणि भाजपचा राजीनामा देत ते लगेच काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 2019 ची निवडणूक लढले. पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजप नेत्यांसोबत सलगी साधत पुन्हा भाजपात प्रवेश केला. आता त्यांना पुन्हा काटोल मतदारसंघ खुणावू लागला आहे.

भाजपने उमेदवारी दिली याच आत्मविश्वासत त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली. यावरून त्यांचे स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबतही खटके उडत आहे. दोन दिवासंपूर्वी भाजपचे इच्छुक उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्याशी त्यांचे वाजले.

आता अनिल देशमुख यांनी 'भगोडा आमदार' म्हणून देशमुखांना डिवचले आहे.आशिष देशमुख मतदारांना वाऱ्यावर सोडून पळून गेले होते. असा आमदार आता मतदारांना नको आहे. ते आपल्याच कार्यकर्त्यांना अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढायला सांगा. मी त्यांना मदत करतो, असे सांगत असल्याचेही यावेळ सलील देशमुख यांनी सांगितले.काका अनिल देशमुख आणि चुलत भाऊ सलील देशमुख यांनी आशिष देशमुख्यांच्या निष्ठेवरच बोट ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT