Nagpur Congress Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress Politics : काँग्रेसचे बंडखोर मुळक यांना भलताच 'कॉन्फिडंट'; विजयोत्सवाची सुरू केली तयारी

Congress Rajendra Mulak Nagpur Ramtek constituency : रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांनी विजयोत्स्वाची तयारीसुद्धा केल्याचे समोर आले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात झालेल्या बंपर मतदानामुळे अपक्ष उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाढीव मतदान आपल्यालाच मिळाणार असल्याचे दावे-प्रतिदावे केले जात आहे.

यात मतमोजणी व्हायची बाकी असली, तरी रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांनी विजयोत्सवाची तयारीसुद्धा केल्याचे समोर आले आहे. अनेक वर्तमानपत्रांच्या कार्यालयात त्यांच्या समर्थकांनी निकालाच्या दिवशी जाहिराती बुक करण्यासाठी फोनाफोनी सुरू केली आहे.

रामटेकमध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्षाचे विशाल बरबटे उमेदवार आहेत. मुळक दहा वर्षांपासून रामटेकमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये उद्वव ठाकरे यांच्या वाट्याला गेला. त्यामुळे मुळकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून, तर प्रचारापर्यंत काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले होते.

रामटेकचे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला सोबत होते. जिल्ह्याचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्यासाठी जाहीर सभासुद्धा घेतल्या. यामुळे महाविकास आघाडीमध्ये येथे बेबनाव निर्माण झाला होता. केदारांच्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यांनी फारशी दखल घेतली नाही. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्याकडे अशा काही तक्रारी आल्या नाहीत, चौकशी करून सांगतो, असे म्हणून शेवटपर्यंत टाळाटाळ केली. ही संधी साधून मुळक काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असल्याचे मतदारांवर बिंबण्यात आले.

दुसरीकडे भाजप महायुतीने आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी दुखावले होते. त्यांना जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर होताच उघडपणे भाजप नेत्यांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा मुळक यांच्या पाठीशी उभी केली होती.

मुळक यांना काँग्रेस पंजा चिन्ह मिळाले नसले, तरी त्यांनी त्यांच्या 'बॅट'ने मतदरासंघात जोरदार बॅटींग केली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुनावला आहे. आता आमच्या विजयाची फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी असल्याचा मुळकांच्या समर्थकांनी दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT