Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे‘ आणि 'एक है तो सेफ है', या घोषणा धमकीवजा आहेत.
यामाध्यमातून मतदारांना भीती दाखवल्या जात आहे. त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव टाकत असल्याचा आरोप आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार चंद्रशेखर आझाद यांनी केला.
दहा वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला (BJP) नागरिकांना सुरक्षा देता येत नाही, असा या घोषणांचा अर्थ होतो. ती देता येत नसेल तर त्यांनी खुर्ची रिकामी करावी, अशी मागणीही खासादर आझाद यांनी केली. आझाद समाज पार्टीची महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नागपूर जिल्ह्यात तीन उमेदवार पक्षाने उभे केले आहेत. खासदार उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपूला आले होते.
खासदार चंद्रशेखर आझाद म्हणाले, "मोदी आणि योगी यांच्याकडे सत्ता आहे. पोलिस (Police), देशाचे सैन्य आणि सर्व तपास यंत्रणा त्यांच्या अखत्यारित येतात. असे असताना देशाचा प्रमुखच 'बटेंग तो कटेंग', कसा काय म्हणून शकतो, असा सवाल त्यांनी केला". या देशातील हिंदू असो व अल्पसंख्य त्यांना असुरक्षित वाटत असले तर त्यांनी आमच्या सोबत यावे आम्ही त्यांना सुरक्षा देऊ, एवढी ताकद आमच्यात असल्याचा दावाही त्यांनी केला.
'भाजपकडे सांगण्यासारखे काही नाही. विकासावर ते कधी बोलत नाहीत. जनतेची दिशाभूल करणे आणि भावनिक मुद्दे उपस्थित करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. 'बटेंगे तो कटेंग', ही घोषणेचा उगम आमच्या उत्तर प्रदेशातूनच झाली आहे. जे या घोषणा देत आहेत त्यांना स्वतःचा प्रदेश सांभळता येत नाही", असा टोला देखील मुख्यमंत्री योगींना खासदार आझाद यांनी लगावला.
'प्रयागराजमध्ये लाखो युवक युपीएससीचा अभ्यास करत आहेत. परंतु परीक्षा घेतली जात नसल्याने तीन दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकार ‘वन नेशन वन इलेक्शन'च्या तयारीत आहेत. मात्र 'वन टाइम वन शिफ्ट'मध्ये पेपर घ्यायची सरकारची हिंमत नसल्याचा आरोप करत फक्त घोषणा केल्याने काही होत नाही. जनतेचे काम करावे लागणार आहे, तरच जनता मतदान करते', असेही खासदार आझाद यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.