Sunil Kedar : 'उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच रामटेकमध्ये काँग्रेसची बंडखोरी' ; केदारांचा दावा!

Ramtek Assembly Constituency : ...तर सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या आरोप भास्कर जाधव यांनी केलेला आहे.
Sunil Kedar | Uddhav Thackeray
Sunil Kedar | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ramtek News: रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसने बंडखोरी केली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे केदारांवर सर्वांचा मोठा रोष आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी केदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. यावर केदार यांनी प्रथमच भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसने येथे बंडखोरी केल्याचा दावा त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार आशिष जयस्वाल यांनीच उद्धव ठाकरेंची साथ सोडली. 'मातोश्री'च्या विरोधात ते बोलत आहेत. त्यांना सत्तेच माज आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केल्याने त्यांना त्याची जागा दाखवायची आहे. याकरिता आम्ही राजेंद्र मुळक यांना उभे केले असल्याचे स्पष्टीकरणही सुनील केदार (Sunil Kedar) यांनी जाहीर सभेत दिले.

Sunil Kedar | Uddhav Thackeray
Nana Patole : सुनील केदारांच्या धाकामुळे नाना पटोलेंची चुप्पी; रामटेकच्या बंडखोरीवर बोलण्यास नकार

रामटेकच्या आमदार बिना कोटचा वकील आहे. मुख्यमंत्री आल्यावर तो त्यांच्याप्रमाणे बोलतो. स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. जीआर काढल्याचे आव आणतो. आम्हाला गद्दारी सांगणारा रामटेकच्या आमदाराला धडा शिकवणे आवश्यक आहे. माझ्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मन दुखावले असू शकते. मात्र त्यांना माझे भाषण ऐकवले पाहिजे. उद्धव ठाकरे यांचे मीठ खाऊन अपमान करणाऱ्या माणसाला जागा दाखवण्यासाठी ही भूमिका घेतली आहे. ऐकून घे आशिष जयस्वाल हा सुनील केदार मागून वार करत नाही, समोरून वार करतो.', असेही केदारांनी जाहीर सभेतून ठणकावले.

Sunil Kedar | Uddhav Thackeray
Mahavikas Aghadi : काँग्रेस नेत्यांकडून बंडखोराला ताकद; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

याशिवाय 'आशिष जयस्वालने माझ्याबद्दल बोलू नये. विकास काय असतो हे सावनेरला येऊन बघावे. उद्धव ठाकरेंची चिंता कोणी करण्याची गरज नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत. पुढेही राहणार आहे. उद्धवजी तो तुम्हाला वाटेल तसे बोलला त्याचा बदला आम्ही घेणार आहोत. मातोश्रीच्या विरोधात बोलणाऱ्याला जागा दाखवतो.', असाही थेट इशारा केदारांनी यावेळी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com