CM Eknath Shinde, Ajit Pawar & Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Assembly Election 2024 : राष्ट्रवादीचे नेते म्हणतात, 'आम्हाला महायुतीच्या बंधनातून मुक्त करा'

Nagpur Mahayuti Politics : नागपूर जिल्ह्यात 12 पैकी अकरा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उभे आहेत. रामटेकमध्ये शिवसेनाचा उमेदवार आहे. महायुतीत समन्वय राहावा आणि सर्वांना एकमेकांची मदत व्हावी याकरिता समन्वयक नेमण्यात आले होते. मात्र, त्यांच्याशी आजवर भाजपच्या एकाही उमेदवारांनी संपर्क साधला नाही.

Rajesh Charpe

Nagpur News. 09 Nov : लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची चांगलीच एकजूट होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) प्रचार यात्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) शहराध्यक्षांना घेऊन फिरत होते.

ज्या विधानसभा मतदारसंघात प्रचार यात्रा आहे त्या मतदारसंघाच्या अध्यक्षांना ते आपल्या जीपमध्ये बसवत होते. त्यामुळे एक चांगला संदेश जनतेत गेला होता. राष्‍ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मानसन्मान मिळत असल्याने तेसुद्धा खूश होते. कोणीच तक्रारी केल्या नाहीत. ग्रामीण मध्येही हेच चित्र होते.

मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा (BJP) मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात 12 पैकी अकरा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उभे आहेत. रामटेकमध्ये शिवसेनाचा उमेदवार आहे. महायुतीत समन्वय राहावा आणि सर्वांना एकमेकांची मदत व्हावी याकरिता समन्वयक नेमण्यात आले होते.

मात्र, त्यांच्याशी आजवर भाजपच्या एकाही उमेदवारांनी संपर्क साधला नाही. प्रचारात बोलावत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. आपला रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या उपस्थितीत ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, समन्वयक यांची तातडीची बैठक घेण्यात आली.

यात त्यांनी आपला नाराजी उघडपणे बोलून दाखवली. भाजपच्या उमेदवारांना आपली गरज नसेल, आपण नको असले तर कशाला त्यांच्या सतरंज्या उचलायच्या असा प्रश्न अध्यक्षांकडे केला. आम्हाला महायुतीच्या बंधनातून मुक्त करा.

आम्हाला ज्यांचे काम करायचे त्यांचे काम करू, ज्याला गरज असेल त्याची मदत करू, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार हेसुद्धा महायुतीच्या नेत्यांवर नाराज असून दे देखील महायुतीच्या प्रचारात सहभागी नसलयाचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT