Prashant Bamb Rally Video : 15 वर्षात रस्ता तरी केला का? आमदाराला प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण

Gangapur Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा राडा झाला आहे. प्रचारासाठी आलेल्या आमदारांना प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
Prashant Bamb Meeting
Prashant Bamb MeetingSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 09 Nov : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या सभेत मोठा राडा झाला आहे.

प्रचारासाठी आलेल्या आमदारांना प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गंगापूर विधानसभा मतदारसंघात भाजप (BJP) आमदार प्रशांत बंब हे प्रचारासाठी गेले होते. गवळी शिवरा येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला ते संबोधित करत असताना एका तरूणाने, 'तुम्ही तीन टर्म आमदार आहात, तुम्ही 15 वर्षांत काय केलं. रस्ता तरी केला का?' असा प्रश्न विचारला.

Prashant Bamb Meeting
Sanjay Raut : "ते राज ठाकरे असतील तर मी बाळासाहेबांनी घडवलेला राऊत"; संजय राऊतांनी सगळंच काढलं

तरुणाने प्रश्न विचारताच बंब संतापले आणि त्यांनी या तरुणाला मंडपातून बाहेर काढा असं सांगितलं. यानंतर बंब यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत या व्यक्तीला थेट सभास्थळावरून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Prashant Bamb Meeting
Lawrence Bishnoi Gang : झिशान सिद्दिकींना भेटलेले खासदार बिश्नोई गँगच्या टार्गेटवर; काय आहे कारण?

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनी आता लोक प्रतिनिधींना प्रश्न देखील विचारायचे नाहीत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com