Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly Winter Session 2023 : देशातील सर्वात अत्याधुनिक हिरे व्यापार केंद्र सुरतेत नाही मुंबईत; फडणवीसांनी काय सांगितले?

Devendra Fadnavis Statement On Mumbai Diamond Market : मुंबईतील हिरे व्यापारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात नेमकं काय म्हणाले?...

Anand Surwase

Nagpur Assembly Session 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरातमधील डायमंड सिटी सुरतमध्ये डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. त्यावरून राज्याच्या राजकारणात महाराष्ट्रातील उद्योग आणि हिरे व्यापार केंद्र गुजरातला पळवल्याचा आरोप करत विरोधकांनी रान उठवले. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मुंबईचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. तसेच देशातील अत्याधुनिक नवीन जेम्स आणि ज्वेलरी पार्क आपण मुंबईत उभारत असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरतेत हिऱ्यांचा व्यवसाय आहे. सुरतमध्ये हिरे निर्मिती होते. आपल्याकडे निर्मिती आणि निर्यात दोन्ही होते. आपण निर्यातीचे केंद्र आहोत. तसेच सुरतमध्ये हिरे निर्मिती बोर्स तयार झाला असला तरी मुंबईतील एकही हिरे निर्मितीचा उद्योग तिकडे गेलेला नाही. आमच्यापैकी एकही उद्योग सुरतला जाणार नाही. उलट आमचा उद्योग वाढत आहे. भारतात 38 बिलियन डॉलरची जेम्स आणि ज्वेलरची निर्यात या वर्षात झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील हिरे उद्योगाचा वाटा हा 75 टक्के इतका आहे. सुरतचा वाटा 12 टक्के आहे. कोरोनाच्या काळात भारत बोर्स निर्यातीची मागणी करत होते. ( Maharashtra Assembly Session 2023 ) मात्र आपण त्यांना निर्यातीला परवानगी द्यायला 8 महिने उशीर झाला. त्याचा फटका या उद्योगाला बसला. मुंबईतील हिरे निर्यातीमध्ये घसरण झाली होती. मात्र महाराष्ट्रातून आता पहिल्या पेक्षा जास्त निर्यात झाली आहे. तसेच सुरत पहिल्या पेक्षा 2 टक्के खाली आली आहे, असे मुंबईतील भारत डायमंड बोर्सने सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईमध्ये नवीन जेम्स आणि ज्वेलरी पार्कला महापेमध्ये 20 एकर जागा दिली आहे. इटली आणि तुर्की इथे ज्या प्रकारचे पार्क झाले आहेत. तसाच डायमंड पार्क आपण मुंबईत उभा करत आहोत. त्यामुळे येथून हिरे उद्योग बाहेर जाण्याचा प्रश्न नाही. तसेच तुर्की डायमंड बोर्स हा मुंबईत येणार असल्याचे त्यांनी निश्चित केले आहे. केंद्राने मेगा सीएफसी प्रकल्प दिला आहे, तो मुंबईत होणार आहे. त्यासाठी केंद्राने देशातील आघाडीची मलाबार गोल्ड, तनिष्क यांनी आपले मुख्य कार्यालय मुंबईत करण्याचे निश्चित केले आहे. त्याचा प्रमुख फायदा महाराष्ट्राला होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

उद्योग वाढतील त्यावेळी इतर राज्ये हे उद्योग त्यांच्या राज्यात येण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र मुंबई ही मुंबई आहे, तिच्याशी कोणी स्पर्धा करू शकत नाही. तसेच तिचे महत्त्व कमी होणार नाही. त्यामुळे मुंबईतून कोणताही उद्योग बाहेर राज्यात जाईल हे डोक्यातून काढून टाकावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT