Devendra Fadnavis : विदर्भाच्या प्रश्नांवरून फडणवीसांकडून विरोधकांची कानउघडणी

Nagpur Winter Session : विरोधकांना विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर उत्तरे देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या प्रश्नांवरून विरोधकांची चांगलीच कान उघडणी केली. हिवाळी अधिवेशन विदर्भात असताना विरोधकांना विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. सभागृहात विविध मुद्द्यावर चर्चा झाली मात्र विदर्भाच्या प्रश्नावर कोणीही चकार शब्द काढला नाही. याचा खेद वाटत असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाने या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नावर चर्चेचा प्रस्तावच मांडला नाही. विजय वडेट्टीवार, नाना पटोले हे विदर्भातील नेते होते, त्यांनी विदर्भातील प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव मांडणे अपेक्षित होते. मात्र कोणीही या सभागृहात चकार शब्द काढला नाही. विदर्भामध्ये अधिवेशनासाठी आलेल्या विरोधकांना विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला, याचा मी निषेध करत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

विदर्भात हे अधिवेशन घेण्यामागचा मूळ हेतूच येथील जनतेचे प्रश्न मांडणे आणि सोडवणे हा असतो. विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विदर्भावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, विरोधकांकडून असा कोणताही प्रस्ताव चर्चेत आला नाही. ही खेदाची बाब आहे, असे असले तरी आम्ही विदर्भाला विसरणार नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

Devendra Fadnavis
Satej Patil News: सतेज पाटलांनी मनसुबे उधळले; मुख्यमंत्री येण्याआधीच डाव साधला..

विदर्भाचा विषय सत्तारूढ पक्षाने मांडला. त्यामुळे आम्ही तो मांडला नाही, असे उत्तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी होता. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. त्यांना माहिती होते अधिवेशन संपत आले आहे. त्यांनी त्यावेळी सांगायला पाहिजे होते की आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव मांडणार नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी बाहेर एक आणि आत एक असे बोलण्याचे धंदे बंद करावे, असा टोला अजित पवार यांनी लगावला. एकनाथ शिंदे फडणवीस आणि आम्ही ठरवले की विदर्भाच्या मुद्द्यावर प्रस्ताव आला पाहिजे त्यानंतर दरेकर यांनी प्रस्ताव मांडला असल्याचेही पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भाच्या संदर्भात प्रस्ताव मांडण्याचे काम प्रवीण दरेकरांनी केले आहे, जे विरोधकांनी करणे अपेक्षित होते. असे असले तरीही आता विधान परिषदेत फडणवीस उत्तर देतील आणि ते उत्तर संपूर्ण विदर्भातील जनतेच्या प्रश्नासाठी असेल असेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

Edited by: Mangesh Mahale

Devendra Fadnavis
Pune News: माजी खासदार शिरोळेंच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com