Sanjay Raut-Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Patole Vs Raut: 'महाविकास आघाडी'त 'शिक्षक अन् पदवीधर'वरुन बिघाडी..? राऊतांचा 'मैत्रीपूर्ण' लढतींचा इशारा, काँग्रेसच्या पटोलेंचंही मोठं विधान

Teachers Graduates MLC Election: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या ५ जागांसाठी मुंबईत जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत. मात्र, सहजासहजी या बैठकांमधून तोडगा निघण्याची शक्यता सध्यातरी कमी दिसून येत आहे. कारण विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसनं आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Deepak Kulkarni

Maharashtra News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि मराठवाडा (संभाजीनगर) पदवीधर मतदारसंघाच्या जागांवरून काँग्रेसला थेट इशारा दिला आहेत. त्यांनी महाविकास आघाडीत जर अमरावती शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर या दोन जागांबाबत एकमत झाले नाही किंवा या जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या नाहीत, तर पक्ष या जागांवर 'मैत्रीपूर्ण लढत' लढण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंआहे. यावर आता काँग्रेसचीही भूमिका समोर आली आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी संजय राऊतांच्या दाव्याचा संदर्भ देत महाविकास आघाडीमध्ये एकजूट कायम राखण्याचा प्रयत्न असला, तरीही जागावाटपाचा तिढा न सुटल्यास काँग्रेस देखील मैत्रीपूर्ण लढत लढण्यास पूर्णपणे तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या ५ जागांसाठी मुंबईत जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत. मात्र, सहजासहजी या बैठकांमधून विधान परिषदेच्या अमरावती शिक्षकमसाठी उमेदवार काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला आहे. आता मराठवाड्याच्या पदवीधरच्या जागेवर तोडगा निघण्याची शक्यता सध्यातरी कमी दिसून येत आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि मराठवाडा (संभाजीनगर) पदवीधर मतदारसंघाच्या जागांवरून आमनेसामने आल्यामुळे आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत विरुद्ध पटोले यांनी एकमेकांना इशारा देत मैत्रीपूर्ण लढतीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीच 'मैत्रीपूर्ण लढती'चे संकेत दिल्यामुळे, आता या जागांवर एकमत होणार की मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उभे ठाकणार याकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसनं गुरुवारी (ता.2 ऑक्टोबर) रात्री नागपूर,अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. आता या तिन्हीही मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचं निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या तीनही जागांवर उमेदवार देत काँग्रेसनं आपल्या पारंपरिक आणि हक्काच्या जागांवर दावा कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेस नेत्यांच्या मते, ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद मोठी आहे आणि जिथे बऱ्याच महिन्यांपासून पदवीधर मतदारांची नोंदणी केली गेली आहे, तिथे पक्ष मागे हटणार नाही. आघाडीमध्ये बिघाड न होऊ देता जागांच्या मतभेदांवर तोडगा म्हणून "मैत्रीपूर्ण लढत" हा पर्याय वापरला जाऊ शकतो, असे संकेत दिले जात आहेत.

कोकण आणि नाशिक यांसारख्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील जागावाटपावरून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये (उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रादी काँग्रेस आणि काँग्रेस) अंतर्गत चर्चा आणि चढाओढ पाहायला दिसून येत आहे. या भूमिकेमुळे आघाडीत ताण न वाढवता दोन्ही पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरवून आपली ताकद आजमावण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT