MPSC Protest: 'एमपीएससी' आंदोलनात नवा ट्विस्ट! तीन गट, तीन भूमिका अन् पुण्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

Pune MPSC News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीवरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता नवा ट्विस्ट मिळाला आहे. आंदोलनात मतभेद निर्माण झाल्याचे चित्र असतानाच शुक्रवारी दोन ठिकाणी सुरू असलेले ठिय्या आंदोलन शनिवारी आणखी एक ठिकाणी पोहोचले.
MPSC student Protest.
MPSC student Protest.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीवरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता नवा ट्विस्ट मिळाला आहे. आंदोलनात मतभेद निर्माण झाल्याचे चित्र असतानाच शुक्रवारी दोन ठिकाणी सुरू असलेले ठिय्या आंदोलन शनिवारी आणखी एक ठिकाणी पोहोचले. अलका चौक येथेही विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ठिकाणे वाढली असून, आंदोलनातील अंतर्गत मतभेदही उघडपणे समोर येत आहेत.

पुणे शहरातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर MPSC ची तयारी करणा गटाचे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत, तर गुरुवारी सायंकाळपासून गरवारे कॉलेजजवळील एस. एम. जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत दुसऱ्या गटाचे आंदोलन सुरू आहे. आता अलका चौक येथेही विद्यार्थी ठिय्या आंदोलनाला बसल्याने आंदोलनाचा परीघ आणखी वाढला आहे.

मागण्या समान; मात्र आंदोलनाची दिशा वेगळी

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची मुख्य मागणी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच घेण्याची असली तरी आंदोलन करणाऱ्या विविध गटांच्या भूमिकेत काही महत्त्वाचे फरक दिसत आहेत. एस. एम. जोशी पुलावरील विद्यार्थ्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

दुसरीकडे, शास्त्री रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष हटावची मागणी न करता परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्यावरच मुख्य भर दिला आहे. तर अलका चौकामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी वेगळीच मागणी लावून धरली आहे या दोन्ही आंदोलनाच्या पासून वेगळी अशी मागणी लावून धरत 2025 पासून सुरू असलेली डिस्क्रिप्टिव्ह पद्धतच सुरू राहावी अशी मागणी या आंदोलन विद्यार्थ्यांचे आहे. आयोगावरती आमचा विश्वास असून अनेक ने लागू केलेली पद्धत सुरू राहावी झुंडशाहीच्या माध्यमातून आणि राजकीय मदतीने आंदोलन करून ही पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला आमचा विरोध असल्याचं या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.

MPSC student Protest.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठ्या औषध कंपनीला दणका : 'सिप्ला'च्या गोदामचे औषध विक्री आणि वितरण लायसन्स रद्द

आंदोलनात राजकीय नेत्यांची एन्ट्री

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने पुण्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे तसेच महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर शास्त्री रस्त्यावरील आंदोलनाला सायंकाळच्या सुमारास आमदार धनंजय मुंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

‘स्थगिती’वरून आरोप-प्रत्यारोप

दरम्यान, आंदोलन स्थगित करण्याच्या निर्णयावरूनही विद्यार्थ्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. एका गटाने शिष्टमंडळावर मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या गटाने हा आरोप फेटाळत शिष्टमंडळाचे निर्णय विरोधी पक्षातील काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून घेतले जात असल्याचा दावा केला आहे.

MPSC student Protest.
Jaykumar Gore : सातारा Dcc बँकेच्या सलग तिसऱ्या बैठकीला गोरेंची दांडी; स्वतःहून बाजूला की भाजपनेच जाणीवपूर्वक लांब ठेवले?

स्थगितीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या रोषामुळे अंगलट आल्याने रात्रीतून पुन्हा आंदोलन सुरू करावे लागल्याचा दावाही एका गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनातील दोन्ही बाजूंकडून ‘ विरोधकांकडून पुरस्कृत’ विरुद्ध ‘राजकीय सांगण्यावरून आंदोलन’ अशा स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

3 ठिकाणी ठिय्या; पुणेकरांची कोंडी

एकीकडे एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे आंदोलनाची ठिकाणे वाढत आहेत. शास्त्री रस्ता, एस. एम. जोशी पूल, अलका चौक आणि आता जॉगर्स पार्क येथे देखील काही विद्यार्थी जमल्या असून ते देखील आंदोलन करण्याच्या पवित्रात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चार ठिकाणी आंदोलन सुरू झाल्याने प्रशासनासमोरील आव्हानही वाढले आहे.

या आंदोलनांमुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका पुणेकरांना बसत आहे. आंदोलनातील मतभेद, राजकीय नेत्यांची वाढती उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारची भूमिका यामुळे आता एमपीएससी आंदोलनाचा पुढचा निर्णय काय होणार, याकडे पुण्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

आंदोलकांना पोलिसांच्या नोटिसा

दरम्यान, एस एम जोशी पुलावर तसेच अहिल्या लायब्ररी समोर बसलेल्या आंदोलकांना पुणे शहर पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आंदोलनासाठी परवानगी नाकारत असल्याचे स्पष्ट करत या नोटीसा त्यांना देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com