MLA Bacchu Kadu at Lucknow airport Sarkarnama
विदर्भ

Ayodhya Visit : इच्छित फलप्राप्ती होत नसल्यानं बच्चूभाऊ पोहोचले शरयू तिरावरील दशरथनंदना चरणी

Arrived at Lucknow : भाजपचं सर्वस्व असलेल्या श्रीरामलाच सांगणार आपलं गाऱ्हाणं

जयेश विनायकराव गावंडे

Bacchu Kadu on Farmer : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘कश्ती’ ‘मझधार’ मध्ये सोडत एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राजकीय युद्धात अनेक ‘धनुष्य’ पेलले. परंतु काही केल्या त्यांना इच्छित फलप्राप्ती झाली नाही. त्यामुळं आता रणभुमीत कंटाळलेल्या बच्चूभाऊंनी भाजपचं आराध्यदैवत, सर्वस्व असलेल्या अयोध्येतील शरयू तिरावरील दशरथनंदनाचरणीच आपलं गाऱ्हाणं मांडण्याचं ठरवलंय. त्यानुसार रविवारी (ता. २९) बच्चू कडू उत्तर प्रदेशातील लखनऊ विमानतळावर दाखल झालेत.

उत्तर प्रदेश येथील ‘योगी’च्या भूमित बच्चुभाऊंचं त्यांच्या समर्थकांनी लखनऊ विमानतळावर जोरदार स्वागत केलं. राष्ट्रीय किसान मंचचे अमरेश मिश्रा यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात मंत्रीपद न मिळणे, भाजपकडुन होणारा विरोध, एकनाथ शिंदे यांच्याकडुन न मिळणारं पाठबळ आदी अनेक कारणांमुळं बच्चू कडू नाराज आहे. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवलीय. परंतु बच्चू कडू यांचा अयोध्या दौरा वेगळ्याच कारणांसाठी असल्याचं सांगितलं जातय. शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं, पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी अयोध्येतून ते आंदोलनाचा शंखनाद करणार आहेत. (Maharashtra MLA Bachchu Kadu arrives in Ayodhya of Uttar Pradesh to have darshan of Lord Rama and prays for the BJP and Maharashtra government to come to its senses)

रविवारी (ता. २९) सायंकाळी बच्चू कडू हे अयोध्येत श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. प्रभुच्या चरणी डोकं ठेवल्यानंतर आपल्या सगळ्या मनोवांछित इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थनाच रामरायाला करणार आहे. भूमिपुत्र असल्यानं बच्चू कडू रामचरणी कापूस, तूर, सोयाबीन अर्पण करणार आहेत. रामाचं नाव घेतल्यानं भल्याभल्यांचं कल्याण झालं. अगदी दैत्यराज रावणाालाही मोक्ष मिळाला असं पुराण कथांमध्ये सांगितलं जातं. अशात कुणीच आपलं ऐकत नसल्यानं आपही ‘रामनाम’ घेऊन पाहुच याच विचारांतून कदाचित आंदोलन आणि सभेसाठी बच्चू कडू यांनी अयोध्येची निवड केली असावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लखनऊमध्ये पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात जातीय आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं अशी अपेक्षा आहे. सरकारला सुबुद्धी येण्यासाठी प्रार्थना करू असं यावेळी ते म्हणाले. शहिदांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही अभियान राबवित आहोत. ‘मेरा देश, मेरा खुन’ हे अभियान राबविणार येणार आहे. शेतकऱ्यांचं कुणीही आतापर्यंत भलं केलं नाही. देशात ६५ टक्के शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यांचं कल्याण व्हावं अशी मागणी बच्चु कडु यांनी केली. देशाच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना व्यवस्थित हिस्सा मिळावा, असंही ते म्हणाले. अयोध्येत एका जाहीर सभेला आपण संबोधित करणार असल्याचंही कडू यांनी स्पष्ट केलं.

(Edited By : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT