Nana Patole & Rahul Gandhi. Google
विदर्भ

Bhandara News : ‘पनौती’ शब्दावरून भाजप आपलंच हसू करून घेतेय

अभिजीत घोरमारे

Nana Patole : काँग्रेसच नेते राहुल गांधी यांनी वापरेल्या ‘पनौती’ या शब्दानंतर भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केलीय. या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले फ्रंटफूटवर आले आहेत. भंडारा येथे बोलताना पटोले यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली.

मंगळवारी (ता. २१) राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी जालोर येथील एका रॅलीला संबोधित करताना या शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर भाजपनं त्यांच्यावर चांगलीच टीका केली. (Maharashtra State Congress President Nana Patole Protects Rahul Gandhi On His Words Against PM Narendra Modi As per BJP Allegations During Rajasthan Assembly Election Campaign)

पटोले म्हणाले, राहुल गांधी यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियावर हा शब्द ट्रेंडिंगमध्ये होता. राहुल यांनी सभेत फक्त या शब्दाचा उल्लेख केला. सभेत बसलेल्या काही तरुणांनी त्यावर काही प्रतिक्रिया दिली असू शकते. मात्र काही जण या शब्दावरच अधिकार गाजवत आहे. राहुल गांधी यांनी कुणाचं नावच घेतलेलं नसल्यानं तुम्ही उगाच का हक्क गाजवताय, असा प्रश्न त्यांनी टीका करणाऱ्यांना केला.

विनाकारण या शब्दाचा वापर करून भाजप आपल्याच नेत्यांना नावं ठेवत आहे. देशभरात आपलंच असू करून घेत आहे, असा पलटवार आमदार पटोले यांनी केला. या शब्दावर भाजपनंच राजकारण करणं बंद करावं, असा सल्ला त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धान खरेदीत भ्रष्टाचार

पूर्व विदर्भातील धान खरेदीत सत्तेतील काही दलाल भष्ट्राचार करीत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे. धान खरेदी योजना ही शेतकऱ्यांसाठी असताना भाजपने ही दलालांसाठी अनुकूल बनविली आहे. खुल्या बाजारामध्ये ७२ रुपये किलो सुतळी असताना ४२५ रुपये किलोची सुतळी खरेदी करण्यात आली. यात ३ कोटींची सुतळी ३२ कोटी रुपयांत खरेदी करत सरकारने उधळपट्टी केली आहे, असा आरोप पटोले यांनी केला. अद्यापही धान खरेदी करण्यात आलेली नाही. दुसरीकडे राईस मिलर्सकडून कमिशन, केंद्र देताना कमिशन आदी कमीशनखोरी सरकारनं सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या या कृतीमुळं शेतकऱ्यांना फटका बसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारनं या विषयांकडं तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणीही पटोले यांनी केली.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT