Amravati ZP News .jpg Sarkarnama
विदर्भ

Amravati ZP News: अमरावती जिल्हा परिषदेच्या CEO संजीता मोहापात्रा यांची एकाचवेळी 22 कंत्राटदारांवर मोठी कारवाई, काय आहे प्रकरण?

Amravati Zilha Parishad : अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी कामे मुदतीत न पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना दंड व मुदतवाढ लागू केलेल्या 22 कामांमध्ये दोन प्रमुख कंत्राटदारांवरही कारवाई केली आहे.

Deepak Kulkarni

Amravati News: अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी विकासकामांमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी 22 कंत्राटदारांवर मोठी कारवाई केली आहे. या सर्व कंत्राटदारांकडे स्वच्छ भारत मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 43 गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेतंर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांची कंत्राटं मिळवली होती. पण ही कामं वेळेत न पूर्ण केल्यामुळे संबंधित कंत्राटदारांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहोपात्रा यांनी दंड ठोठावला आहे.

अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता मोहोपात्रा यांनी कामे मुदतीत न पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना दंड व मुदतवाढ लागू केलेल्या 22 कामांमध्ये दोन प्रमुख कंत्राटदारांवरही कारवाई केली आहे. या कंत्राटदारांना आता प्रतिदिन 100 रुपये दंड आकारण्यात येणार असून सशर्त मुदतवाढीचे आदेश मंगळवारी (ता.10 मार्च) मुख्य कार्यकारी अधिकारी महापात्र यांनी काढले आहेत.

कारवाईचा दणका सहन करावा लागलेल्या कंत्राटदारांनी कामे वेळेत न पूर्ण करण्यापाठीमागं विविध कारणे दिली आहेत. त्यात जमीन संपादनातील अडथळा, ग्रामपंचायतींकडून कागदपत्रे मिळण्यास लागलेला विलंब, पावसाळा, मजूर व बांधकाम साहित्याची कमतरता अशा कारणांचा समावेश आहे.

सीईओ संजीता मोहोपात्रा यांनी कारवाईबाबतच्या आदेशात कंत्राटदारांकडून नवीन मुदतवाढीतही कामे मार्गी लागली नाहीत,तर प्रतिदिन आर्थिक दंडाची रक्कम कंत्राटदाराच्या देयकातून कपात करण्यात येईल. तसेच निधीही खर्च न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्रशासनालाही देण्यात आला आहे.

अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या या कारवाईत नागपूर येथील पी.एस.कन्सट्रक्शन कंत्राटदाराकडे सर्वाधिक 9 कामांची जबाबदारी दिली होती. या मंजूर कामांची मुदत ही 12 महिने होती. तर 43 कामांपैकी उर्वरित 21 कामे इतर कंत्राटदारांकडे देण्यात आली होती. या 21 कामांच्या स्थितीबाबत जिल्हा परिषदेकडून माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT