BJP Deputy Sabhapati : उपसभापतिपदी निवड होताच भाजप नेत्याची जातीच्या दाखल्याची सुनावणी ठरली; सोलापूर, उमारग्यात तक्रार

South Solapur News : दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी वर्षा पटणे निवडून आल्यानंतर त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची सुनावणी निश्चित झाली. तहसीलदारांनी नोटीस बजावल्याने या प्रकरणाकडे राजकीय लक्ष वेधले आहे.
BJP Deputy Sabhapati
BJP Deputy SabhapatiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12March : दक्षिण सोलापूर पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड आज (ता. 12मार्च) झाली. बोरामणी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या वर्षा पटणे यांची उपसभापतिपदी निवड झाली. मात्र, उपसभापतिपदी निवड होताच त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या बनावट जातीच्या दाखल्यासंदर्भातील सुनावणी तारीख निश्चित झाली आहे. त्यासंदर्भातील सुनावणीची नोटीस दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी उपसभापती पटणे यांना बजावली आहे.

दक्षिण सोलापूर (South Solapur) पंचायत समितीच्या नूतन उपसभापती वर्षा पटणे यांचा जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार मिलिंद मुळे यांनी केली होती. त्यावर उमरगा प्रांताधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांना प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी उपसभापती पटणे यांना नोटीस बजावली असून या प्रकरणी २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सुनावणी ठेवली आहे.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत उपसभापती वर्षा पटणे ह्या इतर मागास प्रवर्ग (ओबीस) महिलेसाठी आरक्षित बोरामणी गणातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आल्या आहेत. त्यांचा वाणी जातीचा दाखला (caste certificate) बनावट असल्याची तक्रार मुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जमदाडे, उमरग्याचे प्रांताधिकारी दत्तु शेवाळे व धाराशिव जिल्हा जात पडताळणी समितीकडे केली होती.

प्रांताधिकारी शेवाळे यांनी चौकशी करून अहवाल तहसीलदार किरण जमदाडे यांना पाठवला आहे. त्यानंतर त्यांनी बुधवारी (ता. ११ मार्च) पटणे यांना नोटीस बजावली आहे. येत्या २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात सुनावणी होणार आहे.

BJP Deputy Sabhapati
Sangola Politic's : शेकापची 50 वर्षांची सत्ता संपुष्टात; सांगोल्यात भाजपचा सभापती, दीपक साळुंखेंची ऐनवेळी पलटी

वर्षा पटणे यांचा जातीचा दाखला उमरगा प्रांत कार्यालयाने दिला नसल्याचा अहवाल प्रांताधिकारी दत्तू शेवाळे यांनी दिला आहे. त्यांचा जातीचा दाखला वर्षा शिवाजी कोनाळे (रा. फणेपूर, ता. उमरगा) या नावाने आहे. मात्र, फणेपूर गाव ऑनलाईन प्रणालीत उमरगा उपविभागातील लोहारा तालुक्यात आहे.

त्या प्रमाणपत्रावर डिजिटल स्वाक्षरीनंतर श्री दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी, धाराशिव क्रमांक दोन, ठिकाण धाराशिव अशी मोहर नोंदवली आहे. परंतु या कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर डिजिटल स्वाक्षरीनंतर शेवाळे दत्तू बाळू, उपविभागीय अधिकारी, उमरगा, ठिकाण अशी मोहर नोंदवली जाते. त्यावर उपविभागीय अधिकारी, उमरगा अशी मोहर नोंदवली जाते.

BJP Deputy Sabhapati
Mohite Patil VS BJP : मोहिते पाटलांची मोठी खेळी : दोन सदस्यांच्या शिंदेसेनेला सभापतिपद, पालकमंत्र्यांना शह देण्याचा डाव

या प्रमाणपत्राची प्रिंट नरेंद्र शशिकांत कांबळे या केंद्र चालकामार्फत काढली आहे. मात्र, आमच्याकडे या नावाचा केंद्र चालकच नाही. बारकोडची तपासणी केल्यावर 'नॉट डाटा फाउंड' असे दाखवते. तपासणीअंती १७ जानेवारी २०२६ रोजी वर्षा कोनाळे यांच्या नावे अनुक्रमांक १९०, जावक क्रमांक ४२५४५६६८६९८ या क्रमांकाचे वाणी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही, असे प्रांताधिकारी शेवाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जमदाडे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com