Mahayuti Government Formation Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी देवाभाऊंनी दिलं चहावाल्याला निमंत्रण!

Mahayuti Government Formation: देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तत्पूर्वी दोन वेळा ते पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातूनसुद्धा निवडूण आले होते. गोपाल बावनकुळे यांचा टी स्टॉल पश्चिम नागपूर मतदारसंघात आहे.

Rajesh Charpe

Nagpur News: राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. नागपूरमध्ये झळकलेले पोस्टर्स, कोट घेऊन निघालेला टेलर आणि त्यांची अनेक मित्रमंडळी मुंबईला निघाली आहे. हे बघता फडणवीस हेच पाच डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे दिसून येते. शपथविधीसाठी फडणवीस यांनी काही जणांना निमंत्रित केले आहे. यात नागपूरच्या एका चहावाल्याचा समावेश आहे.

गोपाल बावनकुळे असे या चहावाल्याचे नाव आहे. शहरातील रामनगर परिसरात त्याचा टी स्टॉल आहे. तो फडणवीस यांचा जबरा फॅन आहे. टी स्टॉलवर त्याने देवाभाऊचा फोटोही लावला आहे. देवाभाऊ आपले दैवत असल्याचे त्याचे म्हणणे असून देवाभाऊंनी आपल्याला शपथविधीसाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले असल्याचा दावा गोपाल बावनकुळे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तत्पूर्वी दोन वेळा ते पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातूनसुद्धा निवडूण आले होते. गोपाल बावनकुळे यांचा टी स्टॉल पश्चिम नागपूर मतदारसंघात आहे.एकदा देवेंद्र फडणवीस आपल्या स्टॉलवर चहा प्यायला आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर एकदा चहा प्यायला या अशी विनंती बावनकुळे यांनी त्यांना केली होती. त्यांनी लगेच होकार दिला होता.

"दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस यांनी आपल्या स्टॉलवर चहाचा आस्वाद घेतला होता. तेव्हापासून आपण त्यांचे फॅन झालो. स्टॉलवर असलेल्या देविदेवतांच्या फोटोच्या शेजारी त्यांचा फोटो लावला. आता देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याचे प्रचंड आनंद आहे. त्यांचा शपथविधीची सोहळा डोळ्यास साठवून घ्यायचा आहे. यासाठी आपण मुंबईला सोहळ्याला जाणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. शपथविधी सुरू असताना नागपूरमध्ये आपल्या स्टॉलवरून देवाभाऊंच्या समर्थकांना मोफत चहा पाजणार असल्याचेही गोपाल यांनी जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT