Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Mahayuti News : सीएम शिंदेंच्या विश्वासू नेत्यानं जागा वाटपाबाबत दिली मोठी अपडेट; म्हणाले,'येत्या आठ-दहा दिवसांत...'

Uday Samant Politics : शरद पवार यांना उच्च न्यायालय बरोबर कळते. त्यामुळे त्यांनी ट्विट केले. विरोधकांनी आता महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेतला आहे. तो योग्यच आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : महायुतीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. यावरून वादही उफाळण्याची शक्यता आहे. काही पक्षांच्या उमेदवारांनी परस्पर दावे केले आहे. असे असले तरी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र जागा वाटपाबाबत मतभेद नसल्याचे सांगितले. येत्या आठ-दहा दिवसांत जागा वाटपावर चर्चा होईल. तीनही पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील असा दावा केला.

यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी उदय सामंत नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच सर्वाधिकार देण्यात आले असल्याचे सांगितले.

महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षा झालीच पाहिजे. आमचेही तेच मत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सर्व कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, विरोधक याचे भांडवल करीत आहे. त्यांना राजकारणच करायचे आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करता येणार नाही असा आदेश दिला आहे.

शरद पवार यांना उच्च न्यायालय बरोबर कळते. त्यामुळे त्यांनी ट्विट केले. विरोधकांनी आता महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेतला आहे. तो योग्यच आहे. यावेळी उदय सामंत (Uday Samant) यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निर्णयावर बोलणे हा न्यायालयाचा अवमान होईल असे सांगून काही बोलण्यास नकार दिला.

महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याचा महाराष्ट्र बंद उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला होता. राजकीय पक्षांना कुठलाही बंद पुकारता येत नाही,जर कोणी अशाप्रकारे बंद करत असेल तर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले होते.त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याच्या बंदबाबत भूमिका जाहीर करत आपण हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.

यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या बंदबाबतच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेले होते. आता काँग्रेस नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी देखील भूमिका जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT