Aaditya Thackeray : वरळीत पाहिजे 'घड्याळाचा आमदार'; आदित्य ठाकरेंच्या विरोधात अजितदादांचा शिलेदार मैदानात?

Aaditya Thackeray Vs amol mitkari assembly election : महायुतीच्या नेत्यांनी वरळीतून विजयी होण्याचा दावा केला असला तरी मनसेकडून मात्र या मतदारसंघात लढण्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Amol mitkari News : आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महायुती कामाला लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जन सन्मानयात्रेच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अजित पवार यांची ताकद प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात असताना त्यांनी मुंबईतील काही जागांवर देखील अजित पवार दावा सांगण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वरळी मतदारसंघात अमोल मिटकरी हे वरळीचे आमदार असतील, असे बॅनर लावले आहेत.

पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरमुळे वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी अशी लढत होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना फार मोठे लीड वरळी मतदारसंघातून मिळाले नाही. त्यामुळे या वरळी मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा दावा महायुतीचे नेते करत आहेत.

महायुतीच्या नेत्यांनी वरळीतून विजयी होण्याचा दावा केला असला तरी मनसेकडून मात्र या मतदारसंघात लढण्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे हे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत.

Aaditya Thackeray
Sanjay Bansode News : निधीवाटपावरून महायुतीमध्ये मतभेद; मंत्री संजय बनसोडेंच्या विरोधात शिवसैनिकांची खदखद

राज ठाकरे यांनी परवानगी दिली तर आपण वरळीतून लढणार असे संदीप देशपांडे यांनी जाहीर केले होते. मनसे आत्तापर्यंत सात उमेदवारांची नावे आणि त्यांचे मतदारसंघ जाहीर केले आहेत मात्र वरळीतून अजून आपला उमेदवार घोषित केला नाही.

मनसे- मिटकरी यांच्यात वाद

मनसे देखील वरळी मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहे. अमोल मिटकरी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अकोल्यात वाद झाला होता. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने हा वाद आणखी वाढला होता. त्यामुळे मिटकरी हे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढले तर त्यांना मनसेकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray
Sanjay Raut : संजय राऊत न्यायालयावर भडकले, म्हणाले, 'टाळे लावा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com