Vidarbha Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणावर काँग्रेस नेते राहुल गांधी असल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसेच राज्यातील माहितीच्या सरकार वर सडकून टीका केली.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना तीन हजार रुपये याचा आश्वासन महाविकास आघाडीने (Mavikas Aaghadi) दिले आहे. हे आश्वासन कसं पूर्ण करणार असा प्रश्न विचारला असता मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सत्ता दिली तर आम्ही यासाठी बजेट निर्माण करू सरकार चालवायला खोक्यांची नाही तर डोक्याची गरज असते. आमच्याकडे डोके आहे, त्यामुळे योजनेचा 3000 मोबदला आम्ही नक्की देऊ असं सांगत त्यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रभर फिरून मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , भाजपशासित विविध राज्याचे मुख्यमंत्री , भाजपचे वरिष्ठ नेते राज्यात ठाण मांडून बसले आहेत. एका राज्यासाठी सरकारला इतकी शक्ती लावावी लागत आहे सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
महाराष्ट्रात त्यांच्या सरकार असताना ते विकास कामावरती बोलायचं सोडून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरती टीका करत आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार आले आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले, अशा भीतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी गांधी कुटुंबीयांवर टीका असं समजू शकतो. परंतु तशीच टीका आताही सुरू असून राहुल गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत का ? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शेतकरी, तरुणांना काय देणार आणि विकास कसा करणार, याबद्दल असं खरगे म्हणाले.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे घोषणा दिला जात आहेत. परंतु देशाला एकसंध ठेवण्याचं काम काँग्रेसनं केला आहे. महात्मा गांधी, इंदिरा व राजीव गांधी यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी बलिदान दिले. मात्र, दुसरीकडे संघ आणि भाजपच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी काहीच केलं नाही. त्यांनी कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्यास नकार दिला होता. मनूच्या विचारांवर घटना लागू करा, म्हणणाऱ्या भाजपला आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेची आठवण आली असल्याची टीका, मलिकार्जुन खर्गे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.