Amravati Police
Amravati Police Sarkarnama
विदर्भ

यशोमती ठाकूरांना धमकी देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

सरकारमाना ब्युरो

अमरावती : अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना धमकी देणाऱ्या तरुणाला गाडगे नगर पोलिसांनी (Amravati Police) ताब्यात घेतले आहे. निवेदन देण्यासाठी हा तरुण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला होता. त्याने पालकमंत्र्यासोबत वाद घातला आणि धमकी दिल्याच्या कारणावरुण पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी ठाकूर यांनीच पोलिसांना फोन करून तरुणावर कारवाईसाठी तक्रार दिली होती. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय (Amravati Collector Office) परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

यशोमती ठाकूर यांनी बुधवारी (ता.8 डिसेंबर) आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आढावा बैठक घेतली. दुपारच्या सुमारास बैठक आटोपल्यानंतर ठाकूर या आपल्या वाहनाकडे जात असताना काहीजण त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले. ज्यामध्ये प्रवीण गाढवे नावाचा युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह उपस्थित होता. मागील महिनाभरापासून एसटी कर्मचारी उपोषण करीत आहेत. आपण सरकार म्हणून त्यांची दखल घ्यावी आणि तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी प्रवीणने आपल्या निवेदनातून केली. मात्र, अचानक कुणालाही काही कळण्याच्या आतच प्रवीण आणि पालकमंत्री यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आणि पालकमंत्र्यांचा पारा चढला. यानंतर सदर तरुणाने आपल्याला 'बघून घेण्याची' धमकी दिली, अशी तक्रार पालकमंत्र्यांनी गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवरून दिली.

आपल्या जीवाला काही बरेवाईट झाले किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी हा तरुण जवाबदार राहील, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत सांगितले. यानंतर पोलिसांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत प्रवीण गाढवे याला ताब्यात घेतले. सदर तरुण हा ओबीसी महासभेचा राज्य अध्यक्ष असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT