Manoj Jarange Patil |Raju Shetti Sarkarnama
विदर्भ

Raju Shetti: मनोज जरांगेंच्या निर्णयाचा फटका राजू शेट्टींच्या परिवर्तन महाशक्तीला बसणार का?

Raju Shetti on Manoj Jarange Decision:मनोज जरांगे यांनी आजवर मराठा समाजाच्या हितासाठी भूमिका घेतली आहे. त्यांनी निश्चितच विचार करूनच निर्णय केला असेल. आम्ही लवकर त्यांना भेटू सविस्तर चर्चा कर.

Rajesh Charpe

Nagpur News: मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांच्या उमेदवारांना माघार घ्यायला सांगितले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जरांगे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. परिवर्तन महाशक्तीमार्फत उमेदवारांना आज पाठिंबा जाहीर करणार असल्याचे सांगितले.

परिवर्तन शक्तीच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणाण्यासाठी राजू शेट्टी यांनी आज विदर्भात बैठक बोलावली आहे. ते म्हणाले, आमचं आयुष्य चळवळीत गेले आहे. त्यामुळे चळवळीतील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना साथ दिली पाहिजे, असे आमचे मत होते. मनोज जरांगे यांनी चळवळीतील लोकांना मदत करावी, अशी अपेक्षा ठेऊन त्यांना दोन दिवसांपूर्वी भेटलो होतो. तेव्हा त्यांनी विचार करून सांगतो असे सांगितले होते.

आताच मला जरांगे यांच्या निर्णयाबाबत माहिती मिळाली. माहिती घेतल्याशिवाय कमेंट करणे योग्य नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आजवर मराठा समाजाच्या हितासाठी भूमिका ठेवली आहे. त्यांनी निश्चितच विचार करूनच निर्णय केला असेल. आम्ही लवकर त्यांना भेटू सविस्तर चर्चा करू. त्यांनी असा निर्णय का घेतला हे समजून घेऊ, असे शेट्टी म्हणाले.

मराठा समाजाला हिताचे निर्णयच ते आजवर घेत आले आहेत. ते घाई गडबडीने निर्णय घेत नाहीत. त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. एका समाजाच्या भरोश्यावर निवडणूक लढता येत नाही, हा त्यांचा मुद्दा योग्य आहे. निवडणूक लढताना सामाजिक समीकरण लक्षात घ्यावे लागतात. हे बघता त्यांच्यावर कुठला दबाव असेल असे मला अजिबात वाटत नाही.

त्यांच्यावर कुठला दबाव आला आणि ते त्यात अडकले असे आजवर झाले नाही. आजवर ते परखड भूमिकाच मांडत आले आहे. जरांगे यांनी माघार घेतली हा शब्द चुकीचा आहे. समाजासाठी काय हिताचे आहे त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असावा. लवकरच आम्ही त्यांना भेटू, असे राजू शेट्टी म्हणाले.

"मनोज जरांगे यांची भूमिका होती की विधानसभेत आपली माणसं गेली पाहिजे. विधानसभेत गेल्याशिवाय समाजाची भूमिका मांडता येत नाही. एखादे आंदोलन दीड वर्ष टिकून आहे, हे सोपे काम नाही. जरांगे यांच्याकडे जे ही लोक गेले, ते स्वार्थासाठी गेले होते. फक्त परिवर्तन महाशक्ती त्यास अपवाद होती," असा दावाही यावेळी राजू शेट्टी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT