Chandrashekhar Bawankule questions why Manoj Jarange Patil is targeting only Devendra Fadnavis. Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation Protest : "एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्याला दिल्यास..."; बावनकुळेंनी 'ती' भीती व्यक्त करत मराठा आरक्षणावरून काँग्रेसची केली कोंडी

Maratha Reservation vs OBC Quota : मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाल्याने मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आंदोलन पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला कोंडीत पकडले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News, 28 Aug : मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाल्याने मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आंदोलन पाठिंबा जाहीर केला आहे.

यावरून भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे का? अशी विचारणा त्यांनी करून नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

ओबीसींचे आरक्षण जात असताना गप्प बसने बरोबर नाही असेही ते म्हणाले. नाना पटोले यांची भूमिका गोलगोल आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे. ही मागणी काँग्रेसला मान्य आहे का, ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का?

ओबीसींच्या आरक्षणात आणखी वाटेकरी आणायचे याचे स्पष्टीकरण काँग्रेसने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. ते जरांगे यांना मान्य नाही. त्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण हवे आहे. एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिल्यास सामाजिक संतुलन तसेच संविधानक ढाचा बिघडण्याचा धोका आहे.

यापूर्वी उद्धव ठाकरे सरकार असताना मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ते टिकले नाही. राहुल गांधींनी ओबीसी समाजाच्या पाठीशी सरकारने राहावे असे आवाहन केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका वेगळीच दिसते. त्यांच्या मनात नेमके काय आहे हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे.

मराठा समाजाला वेगळा आरक्षण दिले आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे. सरकारने चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. एकाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण देणे योग्य नाही. जरांगे यांची जी नवीन मागणी आहे त्याचा विचार केला पाहिजे. राहुल गांधी म्हणतात ओबीसींचे आरक्षण कायम ठेवा, जनगणना करा.

इकडे मात्र काँग्रेस नेते ओबीसीच आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या म्हणत आहेत. यात स्पष्टता आली पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण काढून, मराठा समाजाला द्यायचं आहे का? हा माझा त्यांना प्रश्न आहे.

जरांगेंना समर्थन म्हणजे ओबीसीला त्यांचा विरोध आहे का? असा सवालही बावनकुळेंनी केला. कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते.

तेव्हा त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले. हे सगळं देवेंद्र फडणवीस सरकार असताना झाले. मात्र, आता त्यांनाच टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली जाते. ते मराठा समाजाचे नाही ही त्यांची चूक आहे का? असा सवालही बावनकुळे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT