Manoj Jarange Patil Protest : मोठी बातमी : मनोज जरांगेंसोबत निघालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू; जुन्नरमध्ये दुर्दैवी घटना...

Tragic Death of Maratha Protester En Route to Mumbai : मनोज जरांगे पाटील गुरूवारी पहाटे जुन्नरमध्ये दाखल झाले. त्यानंतर तिथून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांनी मुंबईच्या दिशेन कूच केले आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil’s Ongoing Maratha Protest Movement : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जात असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. जरांगे पाटील जुन्नरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतिश देशमुख असे या मराठा आंदोलकाचे नाव असल्याच समजते.

जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून बुधवारी मुंबईच्या दिशेने कुच केले आहे. गुरूवारी पहाटे ते जुन्नरमध्ये दाखल झाले. गुरूवारी रात्रीच ते जुन्नरमध्ये दाखल होणार होते. पण त्यांच्या मार्गात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आल्याने त्यांना जुन्नरमध्ये येण्यास पहाट उजाडली. ते जुन्नरमध्ये दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये मोठा उत्साह होता.

जरांगे पाटील जुन्नरमध्ये असतानाच सतिश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जरांगे पाटलांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : "मुंबई मराठी माणसांची, फडणवीसांनी शब्दाला जागावं; कबुतरांसाठी आंदोलनला परवानगी देता मग मराठ्यांना का नाही?"

दरम्यान, मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात सरकारने एकच दिवसाची परवानगी दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. ही मराठा आंदोलनाची चेष्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकच दिवस परवानगी देणार असाल तर मराठा आरक्षणाची अंमलबजावणीही एकाच दिवसात करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Agitation: एकनाथ शिंदेंचे मंत्री म्हणाले, जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त!

जाणीवपूर्वक एकच दिवसाची परवानगी दिली आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्यावी. आम्हा गरीब मराठ्यांचा अपमान करू नका. मराठ्यांनी थोडा संयम ठेवावा. आरक्षण घेऊनच आपण माघारी जाणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com