Nagpur News, 22 June : निवडणुका जवळ आल्या की मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसतात. सरकारला वेठीस धरतात. ते कोणाच्या आशीर्वादाने आंदोलन करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवार हेच त्यांचे बोलवते धनी असल्याचा खळबळजनक आरोप माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी केला.
परिणय फुके म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. त्यांना ठरवून पाडण्यात आलं. आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे जरांगेंना पुन्हा जोर चढला आहे. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याचे खुले आवाहन त्यांनी केलं आहे.
हे कोणती तरी राजकीय शक्ती पाठिशी असल्याशिवाय होऊ शकत नाही. जरांगे यांनी उपोषण सुरू केले तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह झाडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना भेटायला गेले होते. ओबीसींच्या आंदोलनाकडे कोणी फिरकत नाही. हे बघता सरळसरळ जरांगे यांचे आंदोलन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुरस्कृत असल्याचे दिसून येतं आहे.
शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात मराठा समाजाला झुकते माप दिले होते. मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री त्यांचेच होते. ओबीसींवर मात्र अन्याय केला. ओबीसींच्या भल्यासाठी त्यांनी कधीच पुढाकार घेतला नाही. केवळ राजकीय गणितं मांडली. आजही ते हेच करीत आहेत.
महायुती सरकारने जरांगे यांची आरक्षणाची मागणी मान्य केली होती. त्यानंतर लगेच त्यांनी सरसकटचा विषय रेटला. त्यानंतर आता सगेसोयरे प्रमाणपत्र देण्यासाठी हट्ट धरत आहेत. त्यांच्या मागण्या संपतच नाही.
महाराष्ट्रात 60 टक्के ओबीसी (OBC) आहेत. त्यांना फक्त 19 टक्के आरक्षण दिलं जातं. त्यात आता मराठा समाज दावा करीत आहे. मराठ्यांचा ओबीसी कोट्यात समावेश करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. हे झाल्यास ओबीसींसाठी फक्त 5 टक्के आरक्षण शिल्लक राहील. भाजप नव्हे तर ओबीसी संघटनेचा कार्यकर्ता या नात्याने आपण या विरोधात लढा देत राहणार असल्याचंही परिणय फुके म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.