OBC Political Breaking : मोठी बातमी! अखेर दहा दिवसानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारेंचं उपोषण स्थगित

Jalna News: वडीगोद्री येथे ओबीसी समाजांच्या मागण्यासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनीबेमुदत उपोषण सुरू केलं होतं.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 22 June : वडीगोद्री येथे ओबीसी समाजांच्या मागण्यासाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. हाके यांची शनिवारी (ता. 22 जून) रोजी मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीदरम्यान, ओबीसी (OBC) समाजाचे नेते आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची मागणी केली.

तसेच सरकार कुणावरही अन्याय करणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. त्यांच्या या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. गेल्या दहा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. यावेळी हाके यांनी सरकार आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचेही स्पष्ट केलं. (Laxman Hake and Navnath Waghmare)

सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर आपण आंदोलन स्थगित करत असलो तरी ओबीसी समाजासाठीचा लढा सुरुच राहणार असल्याचंही हाके यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे सरकारला हाके यांचं उपोषण सोडवण्यात तात्पुरते तरी यश आल्याचं दिसत आहे.

Laxman Hake
Manoj Jarange Patil : "...तर भुजबळ मराठ्यांचे नेते बनले असते"; जरांगे-पाटील असं का म्हणाले?

उपोषणकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय?

ओबीसींच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. याबाबतचे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. तसेच कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात कराव्यात. ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाना आर्थिक तरतूद व्हावी तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, अशा विविध मागण्या होके यांनी सरकारकडे केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com