Manoj Jarange Patil Sarkarnama
विदर्भ

Jarange Warned Dhananjay Munde : फडणवीस सरकारमधला मंत्री मनोज जरांगेंवर संतापला; म्हणाला, 'ते वैफल्यग्रस्त....'

Santosh Deshmukh murder Case : जाणून घ्या, नेमकं कोणी म्हटलं आहे? ; देशमुख कुटुंबीयांना जर काही त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे.

Mayur Ratnaparkhe

Ashish Jaiswal on Manoj Jarange : राज्यात सध्या बीडमधील सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं. शिवाय, यामध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मंत्री धनंजय मुंडे यांचंही नाव समोर येत असल्याने, विरोधकांकडून अधिकच तीव्र टीका होत आहे.

हे प्रकरण केवळ राजकारणापुरतं मर्यादित राहिलं नसून, आता यामध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनीही उडी घेत थेट मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनाच इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी म्हटले आहे की मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही, मात्र देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

यावरून आता महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जस्वाल यांनी जरांगेंवर पलटवार केल्याचे दिसत आहे. 'मनोज जरांगे(Manoj Jarange) वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.', असं जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

तर विरोधकांकडून मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात आहे. यावर बोलताना आशिष जयस्वाल म्हणाले, 'प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नसतं. बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) स्वत: गृहमंत्री असून ते जो कुणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. कायदा आपले काम करणार आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. '

मंत्री आशिष जयस्वाल गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भव्य बाईक रॅली काढून त्यांचे शिवसैनिकांकडून आज जंगी स्वागत केले गेले. कारण, आशिष जयस्वाल हे मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याप्रसंगी त्यांचे फटाके वाजवूनही स्वागत केले गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT