MLA Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Vidarbha News : आशिष देशमुखांचा अवैध वाळू वाहतूकदारांना दणका; स्वतः ट्रकवर चढून पकडली वाळू!

BJP MLA Ashish Deshmukh : सावनेर विधानसभा मतदारसंघाची सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. याचा फायदा वाळू चोरटे घेत आहे. मध्य प्रदेशातली वाळू महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणून विक्री केली जात आहे. हा धंदा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 04 January : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदारांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघात धडाक्यात बॅटिंग सुरू केली आहे. यापूर्वी या मतदारसंघात राजकीय आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. यारिता त्यांनी मध्य प्रदेशातून येणारे अवैध वाळूचे आणि सडक्या सुपारीचे ट्रक त्यांनी पकडले, त्यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

सावनेर विधानसभा मतदारसंघाची सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. याचा फायदा वाळू चोरटे घेत आहे. मध्य प्रदेशातली वाळू (Sand) महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणून विक्री केली जात आहे. हा धंदा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावखोड्यातून ही चोरटी वाहतूक केली जाते. तसेच, राज्य सरकारचा महसूलही बुडविला जात होता.

मध्य प्रदेशमधून सावळी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळू आणली जाते. हे सर्व ट्रक ओव्हरलोड असतात. टोल चुकवण्यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांचा वापर करतात. एक मोठी टोळीच यात सक्रीय आहे.

आमदार आशिष देशमुख यांनी या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतः ट्रक थांबवले. ट्रकवर चढून तपासणी केली असता वाळू, सडकी सुपारी तसेच सुंगधीत तंबाखू त्यात आढळले. हे सर्व ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मध्य प्रदेशातून होणारी चोरटी वाळू, तंबाखुची वाहतूक रोखण्याचे निर्देश देशमुखांनी पोलिस यंत्रणा तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. अनेकांवर मोका लावण्यात आला होता. यात काही आरोपी एका राजकीय नेत्याचे कट्टर समर्थक होते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी मध्य प्रदेशातून येणारी अवैध वाळू, वाळू माफिया, यात कशा प्रकारे गैरव्यवहार होतात, याची सविस्तर माहिती असलेला अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला होता.

महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्याचे नवनियुक्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध वाळू उपसा, चोरी आणि वाळूचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरण ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. महिनाभराताच नवे धोरण लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नागपूर जिल्ह्यात सावनेरसह रामटेक, उमरेड तालुक्यातही वाळूचोरीचा मोठा व्यवसाय फोफावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT