Ravi Rana, Bacchu Kadu sarkarnama
विदर्भ

फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराच्या आरोपानंतर खोक्यांचे राजकारण पुन्हा पेटले

गुवाहटलीला गेल्या आमदार बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : गुवाहाटीवरून दोन आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू रंगले आहे. हे प्रकरण आता पोलिस स्टेशनलाही गेले आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता.

या आरोपांवरून बच्चू कडू यांनी रवी राणा (Ravi Rana) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाही दाखल केला आहे. रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत.

'रवी राणा यांनी माझी बदनामी केली. 20-20 वर्ष आमची राजकीय करिअर उभे करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल, तर पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचे उत्तर दिले पाहिजे' असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखली नोटीस पाठवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

तर तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, अशी मागणी या नोटीसद्वारे करणार असल्याचे कडू म्हणाले. इतकेच नाही तर येत्या १ तारखेपर्यंत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावे, त्यांनी ते पुरावा सिद्ध करून दाखवले. तर मी त्यांच्या घरी भांडी घासेल. माझी लढाई शांततेची आहे. मात्र, जास्त अंगावर आले तर आरपार करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. जिथे म्हणेल तिथे एक तास जाण्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही मंत्रीपदासाठी रांगेत उभे राहिले. आम्ही गुवाहाटी ला गेलो म्हणून तुम्ही बदनामी करायची, हे चालणार नाही. बच्चू कडू स्वतःच्या भरोशावर निवडून आलेला आहे कोणाच्या पाठिंबावर नाही. एक तारखेला अमरावतीच्या टाऊन हॉलमध्ये मी वाट पाहणार आहे. रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाची पुरावे सादर करावे, मी बारा ते चार वाजेपर्यंत वाट पाहिल. त्यांनी ते पुरावे आणावे अशे खुले आव्हान बच्चू कडू यांनी दिले आहे.

रवी राणा काय म्हणाले होते?

आमदार रवी राणा यांनी अलिकडेच अचलपूर येथील प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप राणा यांनी केला होता. इतकेच नाही तर बच्चू कडू यांनी विधान परिषद आणि राज्यसभेसाठी पैसे घेतल्याचा आरोपही राणा म्हणाले होते. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT