Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

आमदार बावनकुळे म्हणतात, हा ब्लॅकमेलींगचा प्रकार, तीन वर्षांपासून आहे त्रास…

ज्या कंपन्यांकडून पैसे घेतल्याचे ते (Ad. Satish Uke) म्हणत आहेत, त्या कंपन्यांनी आजपर्यंत याबाबतीत एकही शब्द कसा काढला नाही, याकडे त्यांनी (Chandrashekhar Bawankule) लक्ष वेधले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते, (BJP) माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर आज ॲड. सतीश उके (Ad. Satish Uke) यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. आमदार बावनकुळे यांचे नातेवाईक सुरज तातोडे यांनाच त्यांनी आज पत्रकारांसमोर उभे केले आणि कोट्यवधींचा काळा पैसा (Black Money) जमा केल्याचा आरोप केला. यासंदर्भात आमदार बावनकुळे यांना विचारणा केली असता, ॲड. उके यांच्याकडून गेल्या तीन वर्षांपासून या ना त्या कारणाने मला त्रास दिला जात आहे. हा शुद्ध ब्लॅकमेलींगचा प्रकार आहे, असे ते म्हणाले.

आमदार बावनकुळे म्हणाले, सुरज तातोडे हा माझा नातेवाईक आहे. माझ्या पत्नीच्या बहीणीचा तो मुलगा आहे. माझ्याकडे मी त्याला काम दिले, रोजगार दिला. त्याला ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला असता, त्यावर योग्य उपचार केले, तो बरा झाला. आता त्याच्या डोक्यात काय फरक पडला, कुणास ठाऊक? की ॲड. सतीश उके यांनी त्याला भ्रमित केले, हे तपासावे लागेल. जे आरोप त्यांनी आज माझ्यावर लावले आहे, ते माझ्याच नातेवाईकाला गळाला लावून केले आहे. पण ज्या कंपन्यांकडून पैसे घेतल्याचे ते म्हणत आहेत, त्या कंपन्यांनी आजपर्यंत याबाबतीत एकही शब्द कसा काढला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ॲड. उके हे गेल्या तीन वर्षांपासून याला त्याला पकडून माझ्यावर विविध आरोप करून मला ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न करीत आहेत. आज शेवटी त्यांनी माझ्या नातेवाईकाला पकडून मिडियासमोर उभे केले आणि बिनबुडाचे आरोप केले. माझा नातेवाईक ॲड. उके यांच्यामार्फत मिडियासमोर येत असेल तर याचा अर्थ कुणाच्याही सहज लक्षात येईल. तसेही ॲड. उके कुणा ना कुणावर आरोप करीत फिरतच असतात. त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही आणि याबाबतीत उद्या काय ते सविस्तर मी बोलणारच आहे. पण वकीलाकडून असे ब्लॅकमेलींगचे प्रकार होत असतील, तर ते चांगले नाही, असे आमदार बावनकुळे म्हणाले. हा कपोलकल्पीत आरोप असल्याचेही ते म्हणाले.

ॲड. उकेंनी जमीन हडपल्याचा आरोप, गुन्हे शाखेने घेतले ताब्यात..

बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपल्याचा आरोप एका महिलेने ॲड. सतीष उके यांच्यावर केला आहे. पिस्तुल लावून धमकी दिली आणि लज्जास्पद शब्द वापरून विनयभंग केल्याचेही त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण १४ वर्षांपूर्वीचे आहे आणि त्यावेळी त्या महिलेने ॲड. उके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर त्यावेळी मी जर बनावट कागदपत्रे तयार केली असतील, तर त्यात तत्कालीन न्यायाधीषांचादेखील तेवढाच दोष समजावा लागेल. कारण न्यायालयात संपूर्ण प्रक्रियेतून कागदपत्रे तपासली जातात, असे ॲड. उके यांनी सांगितले. आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार अॅड. सतीश उके यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT