Narendra Bhondekar and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

MLA Bhondekar News: ...तर मुख्यमंत्र्यांचे ‘खास’ आमदार नरेंद्र भोंडेकर देणार सरकारला घरचा अहेर !

सरकारनामा ब्यूरो

Bhandara District Political News : पूर्व विदर्भातील भंडाऱ्याचे अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास असलेले नरेंद्र भोंडेकर सरकारला घरचा अहेर देण्याच्या तयारीत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मोठा मोर्चा काढण्याची तयारी त्यांनी चालवली असल्याची माहिती आहे. (Hindu Bahujan Federations will hold a march on the winter session)

आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्त्वात हिंदू बहुजन महासंघांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हिंदू बहुजन महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हिंदू बहुजन समाजातील ५८ जातींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे. मोर्चा काढण्याचे नियोजन सुरू असले तरी मोर्चापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या आमदार भोंडेकर सध्या मुंबईत आहेत.

यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार भोंडेकर म्हणाले, अनुसूचित जातींच्या मागण्यांसंदर्भात जर येणाऱ्या काळात बैठक झाली आणि त्यात सकारात्मक तोडगा निघाला, आमच्या मागण्या मान्य झाल्या. तर मोर्चा काढण्याचा विषय उरणार नाही.

महाराष्ट्र सरकारमध्ये आपण सत्तेमध्ये आहात आणि आपल्याच सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याची वेळ येईल, असे आपल्याला का वाटते, असे विचारले असता, सरकारच्या विरोधात नव्हे, तर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा असणार आहे, असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, सद्यःस्थितीत तसे होताना दिसत नाही. अजूनही काही लोकांना आरक्षण मिळत नाहीये. यापूर्वी मातंग, वाल्मिकी समाजाचे मोर्चे निघालेले आहेत. पण आम्ही हिवाळी अधिवेशनावर जो मोर्चा काढण्याचे (गरज पडल्यास) नियोजन करत आहोत, तो सर्व जातींचा, सर्वसमावेशक असणार आहे, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

नरेंद्र भोंडेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत (Election) त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि निवडून आले. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांना मदत केली, असेही सांगण्यात येते. मु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या चांगल्या ‘ट्यूनिंग’चा फायदा भोंडेकरांनी मतदारसंघासाठी करून घेतला. चांगली कामे त्यांनी मतदारसंघासाठी खेचून आणली. येवढे सर्व असल्यामुळे त्यांच्यावर मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही आणि मुख्यमंत्री (Chief Minister) त्यांच्या मागण्या पूर्ण करतील, असा अंदाज आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT