Bhandara-Gondia Politics: निवडणुकीपूर्वीच तापले वातावरण; नातवाच्या हाताने पुतण्याचा काटा काढण्याचा काकांचा डाव?

Rohit Pawar News: रोहित पवारांची ‘एंट्री’, पण ‘सिक्का चलेगा तो पटेल का ही’
Sharad Pawar, Rohit Pawar, Prafull Patel and Ajit Pawar
Sharad Pawar, Rohit Pawar, Prafull Patel and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राज्याच्या राजकीय पटलावर काका -पुतण्याचे दोन गट अस्तित्वात आले. त्यातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राज्यात झालेल्या जिल्हा प्रभारींच्या पक्षीय नियुक्त्यांमध्ये आमदार रोहित पवार यांची नियुक्ती भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी म्हणून करण्यात आली.

रोहित पवारांची नियुक्ती झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच नातवाच्या हाताने पुतण्याचा काटा काढण्याचा काकांचा डाव असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. भंडारा-गोंदिया जिल्हा प्रभारी म्हणून रोहित पवारांची नियुक्ती झाल्याने भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ‘शरदा’च्या चांदण्यात ‘घड्याळा’चे काटे ‘प्रफुल्लि’त होतील की विखूरतील, हे येणारा काळच सांगणार आहे.

आगामी काळात खासदार प्रफुल्ल पटेलांच्या गडात अजित पवार गट विरूद्ध शरद पवार गट अशी चुरस निर्माण होण्याची स्थिती झाली आहे. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेलांच्या गडामध्ये रोहीत पवाराच्या 'एन्ट्री'ने जिल्ह्याचे वातावरण २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वीच तापल्याचे चित्र तयार झाले आहे. परंतु भंडारा-गोंदिया जिल्हा खासदार पटेलांचा गड असल्याने अखेर ‘सिक्का चलेगा तो पटेल का ही’, असे जिल्ह्यातील राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

लोकसभा-२०२४ निवडणुकीला अवघे आठ महिने उरले असून राज्यात प्रत्येक पक्ष राजकारणाचे धागे-दोरे सांभाळण्यात तत्पर झाल्याचे दिसत आहे. त्यातच राज्यात जिल्हा प्रभारीच्या नियुत्या जोरावर असून नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा-गोंदिया जिल्हा प्रभारी म्हणून आमदार रोहीत पवार यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.

Sharad Pawar, Rohit Pawar, Prafull Patel and Ajit Pawar
Bhandara BJP News : तालेंवर होती अपात्रतेची टांगती तलवार, म्हणून बनले 'माफीवीर' !

आमदार रोहीत पवार यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार पटेलांचा गड आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट खासदार प्रफुल्ल पटेलांच्या मागे हात धुवून लागला की काय? असे म्हणण्याची वेळ पटेलनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांवर आली आहे. परंतु यातून नेमके काय साध्य होणार, हे पाहणे औत्सुत्याचे ठरणार आहे.

भंडारा- गोंदिया जिल्ह्यात खासदार पटेलांची पकड अतिशय मजबूत मानली जाते. पटेलांनी आजवर केलेल्या राजकीय कार्याचा आढावा घेतला असता पटेल हे जिल्हावासीयांसाठी कुटुंबातील सदस्यासारखे आहेत. पटेल म्हणतील तेच भंडारा- गोंदिया जिल्ह्यात घडते. त्यामुळे ‘सिक्का चलेगा तो पटेल का ही’ अशी म्हण जनसामान्यात रूढ झाली आहे.

Sharad Pawar, Rohit Pawar, Prafull Patel and Ajit Pawar
Bhandara-Gondia Lok Sabha: प्रफुल पटेलांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात !

सोबतच भंडारा- गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाचे जिल्हा प्रभारी म्हणून पटेल स्वत:च मैदानात उतरणारण्याची शक्यता आहे. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. खासदार पटेलांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे सुरू केले असून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या ताकदीनिशी अजित पवार गटासोबत उभा असल्याचे चित्र दिसून येते.

भंडारा- गोंदिया जिल्ह्यात खा. पटेल हे पंतप्रधान मोदींचे विश्वासू मानल्या जात असल्यामुळेच त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे भाजपालाही माहित असल्याने इतर पक्षांनाही जिल्हा प्रभारीची निवड करताना विचारपूर्वक करावी लागत आहे.

Sharad Pawar, Rohit Pawar, Prafull Patel and Ajit Pawar
Bhandara-Gondia News : ‘भावी खासदार’च्या बॅनरबाजीमुळे बदलली लोकसभा निवडणुकीची गणिते !

नाते तुटू नये, अशी दोन्ही गटांकडून अपेक्षा..

खासदार पटेल हे शरद पवार यांच्या अतिशय जवळचे राहिलेले आहेत. आज फक्त राजकारणाच्या हव्यासापोटी पटेल आणि पवार हे दोघेही वेगवेगळ्या गटात विखुरले आहेत. शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलेले आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला कामाचा ठसा उमटवलेले पटेल आणि पवार यांच्यातील नातं हे जिव्हाळ्याचे आहे.

(Sharad Pawar) पवार - पटेलांचे (Prafull Patel) जिव्हाळ्याचे हे नाते तुटू नये अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते करीत आहेत. परंतु भंडारा- गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रभारी म्हणून आमदार रोहित पवारांची (Rohit Pawar) नियुक्ती करणे हे भविष्यात दोन्ही गटांमध्ये किंबहूना दोन्ही नेत्यांमध्ये वित्तुष्ट निर्माण करते की काय, अशी शंका राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना आहे. सन २०२४मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमक काय घडते, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com