Jitendra Awhad NEWS Sarkarnama
विदर्भ

Jitendra Awhad: फडणवीसांची 'मनोरूग्ण नवी टेक्नीक'; आव्हाडांना नेमकं काय म्हणायचंय!

Somnath Suryavanshi case Maharashtra winter season: बोरीवलीतील ट्रेनमध्ये झालेल्या फायरिंगनंतर संबधित पोलिस हा मनोरुग्ण असल्याची बोंबाबोंब केली होती, त्यावेळेस मी प्रश्न विचारला, मनोरुग्णाच्या हातात बंदूक कशी दिली? त्यावर काही बोलले नाहीत.

Mangesh Mahale

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुत्युप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिवाळी अधिवेशनात माहिती दिली. यावरुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांच्या उत्तराची खिल्ली उडवली आहे. अधिवेशनात फडणीसांनी जे काही सांगितले, ते विरोधाभासी असल्याचे आव्हाड म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की,परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस ज्याने केली तो आरोपी दत्ताराव पवार हा मनोरुग्ण आहे.'त्याला आपल्या कृत्याचा आता पश्चाताप होत आहे. मनोरुग्णाला पश्चाताप होतो, हे पहिल्यांदाच कुठेतरी ऐकायला मिळत आहे. ही त्यांची थिअरी आहे; एखादा गुन्हा लोकांच्या मनातून बाहेर काढायचा असेल तर गुन्हा करणाऱ्यास मनोरुग्ण दाखवतात. बोरीवलीतील ट्रेनमध्ये झालेल्या फायरिंगनंतर संबधित पोलिस हा मनोरुग्ण असल्याची बोंबाबोंब केली होती, त्यावेळेस मी प्रश्न विचारला, मनोरुग्णाच्या हातात बंदूक कशी दिली? त्यावर काही बोलले नाहीत. पण, चार महिन्यानंतर तो मनोरुग्ण नाही, असे डॉक्टरांनी लिहून दिले. तोपर्यंत लोक ते विसरून गेले होते.

"लोकांच्या मनातील गुन्हा विसरून जाण्यासाठी "मनोरूग्णाची नवी टेक्नीक" या सरकारने शोधून काढली आहे. त्याचा वापर याठिकाणी केला की संविधान प्रतिकृती फोडणारा तो मनोरुग्ण होता. तो मनोरुग्ण नव्हता. जर त्याला पश्चाताप झाला तर त्याच्या भावना शाबूत आहेत, त्याचे विचार, त्याचे मन शाबूत आहे. त्याची विचार करण्याची क्षमता शाबूत आहे," असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्युचेही कोणतेच कारण दिलेले नाही. त्याच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या. शवविच्छेदनाच्या वेळेस जुन्या जखमा लिहिल्या जातात की व्रण आहेत म्हणून ! पण, इथे कुठेही व्रण लिहिलेले नाही; तिथे थेट लिहिलेय, मल्टीपल इंज्युरीज् रिझल्टींग टू शाॅक. ते म्हणतात की, सोमनाथ हा पोलीस कोठडीत नव्हता तर तो एमसीआर (न्यायालयीन कोठडीत अर्थात कारागृहात) होता. जर तो न्यायालयीन कोठडीत होता तर ते अजून गंभीर आहे. मग, त्याला जेलमध्ये कोणी मारले? की मारलेच नाही, त्याने स्वतःहून जीव देऊन टाकला? ते तरी समोर आणा!! असे गोल गोल उत्तर देऊन तुम्ही महाराष्ट्राला मुर्ख बनवू शकत नाही, असे आव्हाडांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT