KC Venugopal : राहुल गांधींवर गुन्हा दाखल; काँग्रेस नेत्यांची पोस्ट व्हायरल! भाजपला सुनावलं

KC Venugopal Questions BJP on Ambedkar Issue: " गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातील त्यांच्या तीव्र निषेधाला प्रत्युत्तर म्हणून ही एफआयआर म्हणजे लक्ष विचलित करण्याची युक्ती आहे,"
KC Venugopal
KC VenugopalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरुन देशाचं राजकारण तापलं आहे. अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते देशात विविध ठिकाणी आंदोलनं करीत आहेत. अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट सत्ताधारी भाजप आणि पोलीस प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले आहेत.

दिल्ली पोलिसांवर वेणुगोपाल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसच्या महिला खासदारांनी भाजप नेत्यांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर कारवाई का झाली नाही?, असा सवाल वेणुगोपाल यांनी उपस्थित केला आहे.

"बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवणे हा सन्मान आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातील त्यांच्या तीव्र निषेधाला प्रत्युत्तर म्हणून ही एफआयआर म्हणजे लक्ष विचलित करण्याची युक्ती आहे," असा आरोप त्यांनी केला आहे.

KC Venugopal
Maharashtra Assembly Winter Session 2024 LIVE : संतोष देशमुख हत्या प्रकरणात दूध का दूध पाणी का पाणी होईल - धनंजय मुंडे

"राहुल गांधींना भाजपच्या राजकीय सूडबुद्धीमुळे आधीच २६ एफआयआरचा सामना करावा लागत आहे. ही एफआयआर त्यांना किंवा काँग्रेसला आरएसएस-भाजप राजवटीच्या विरोधात उभे राहण्यापासून रोखणार नाही," अशा शब्दात वेणुगोपाल यांनी भाजपला सुनावलं आहे.

KC Venugopal
Prakash Javadekar : "सलग पराभवामुळेच..."; भाजप खासदारांना धक्काबुक्की अन् 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावरून जावडेकरांनी राहुल गांधींना धुतलं

नेमकं काय आहे प्रकरण

गुरुवारी अमित शहांच्या विरोधात संसद भवन परिसरात इंडिया आघाडीच्या नेत्यांसह खासदारांनी आंदोलन केले.शहांचा निषेध करीत असताना भाजप-काँग्रेसचे खासदार आमने-सामने आले. त्यांच्यात झालेल्या शाब्दीक वादात भाजपचे दोन खासदार गंभीर जखमी झाले आहेत.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमने-सामने आले होते. यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले. काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com