MLA Kishor Jorgewar on Chanrapur Power. Google
विदर्भ

Nagpur Winter Session : राज्याला वीज देऊन पाप करतोय का?

Atul Mehere

Chandrapur : ‘राज्याला वीज पुरविण्यासाठी जगातील सर्वांत प्रदूषित असलेला औष्णिक वीज प्रकल्प आम्ही सहन करतो. आम्ही वीज तयार करतो. त्याचा परिणामही आम्हाला सोसावा लागतो. देशातील सर्वांत प्रदूषित जिल्ह्यात चंद्रपूरचे नाव आहे. मात्र आम्हालाच याचा मोबदला मिळत नाही. हा अन्याय आहे. राज्याला वीज देऊन आम्ही पाप करतोय का?’ असा संतप्त सवाल आमदार किशोर जोरगेवार यांनी केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील विजेच्या समस्येवर त्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज बुलंद केला. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विजउत्पादक जिल्ह्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हातमाग उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने 200 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर वीज उत्पादन करून प्रदूषण सहन करीत असलेल्या जिल्ह्यांना घरगुती वापराची 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी, असं ते म्हणाले.

चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. असं असतानाही प्रदूषित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये चंद्रपूरचं नाव आहे. सर्वाधिक औष्णिक वीज चंद्रपूर जिल्हा उत्पादीत करतो. ही वीज तयार करताना होणारं प्रदूषण आमच्या मुलाबाळांची फुप्फुसं खराब करीत आहे. आमचा श्वास कोंडला जातोय. त्याची शिक्षा आम्हाला सरकार देतेय का, असा प्रश्नही जोरगेवार यांनी उपस्थित केला. खरं तर जो जिल्हा राज्याच्या उर्वरित भागांना वीज देतो, त्याला विजेच्या दरात सवलत मिळायला हवी, असं धोरण असलं पाहिजे असंही ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या चवथ्या दिवशी बुधवारी (ता. 13) नागपूर येथे पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. त्यावेळी किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विजेचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण याच मागणीवर ठाम आहोत आपण आतापर्यंत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, ऊर्जामंत्री यांना निवेदनं दिली आहेत. गेल्या हिवाळी अधिवेशनावर चंद्रपूर येथून 3 हजार मोटर सायकलचा मोर्चाही काढला होता, याचं स्मरण जोरगेवार यांनी करून दिलं. त्यानंतरही अधिवेशनातही कोणताही निर्णय घेतला जात नसल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकार यासंदर्भात कोणताही निर्णय घेणार नसेल तर आगामी काळात आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नऊ हजार मेगावॉटवर निर्मिती

महाराष्ट्रातील सुमारे नऊ प्रकल्पांमधून नऊ हजार मेगावॉटवर वीज निर्मिती केली जाते. त्यातील चार ऊर्जा प्रकल्प विदर्भात आहे. राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती चंद्रपूर येथील औष्णिक प्रकल्पातून केली जाते. विदर्भातील प्रकल्पांमध्ये खापरखेडा, कोराडी, पारस येथील वीज निर्मिती केंद्रांचाही समावेश आहे.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT