Nagpur Winter Session : लोकसभेतील घटनेनंतर विधान भवनाची सुरक्षा वाढविली

Assembly Session : पासेस देण्याची प्रक्रिया तूर्तास होल्डवर; येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी
Security Step Up at Nagpur Vidhan Bhavan.
Security Step Up at Nagpur Vidhan Bhavan.Sarkarnama
Published on
Updated on

High Alert : नवी दिल्ली येथे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशात लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन व्यक्तींनी गॅलरीतून उडी मारली. त्यानंतर त्यांनी एका स्प्रेच्या माध्यमातून लोकसभेत धुर पसरविला. या प्रकारामुळं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील या घटनेचे पडसाद नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनातही उमटले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरातील विधान भवनाच्या गॅलरीसाठी देण्यात येणाऱ्या पासेसचं काम तातडीनं थांबविण्यात आलय. परिसरातील सुरक्षा वेढा आणखी कडक करण्यात आलाय.

Security Step Up at Nagpur Vidhan Bhavan.
Nagpur Winter Session : बुलढाणा रुग्णालयातील घोटाळ्याची नव्यानं चौकशी

नागपुरात अधिवेशन सुरू असतानाच 150 पेक्षा अधिक जीवंत काडतूसं सापडली होती. अमरावती येथे राज्यातील सर्वांत मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला होता. अशात दिल्लीतील संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर विधान भवन, राज भवन, मुख्यमंत्री निवास रामगिरी, उपमुख्यमंत्री निवास देवगिरी, राजगड, आमदार निवास, रवि भवन, सचिवालय, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आलीय. नागपूर विधान भवनात येणाऱ्या प्रत्येकाची आणखी कसून तपासणी करण्यात येत आहे.

सुरक्षा पासेस असल्यानंतरही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ओळखीचा पुरावा मागण्यात येत आहे. अभ्यागतांना आधार, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना दाखविण्यास सांगण्यात येत आहे. लोकसभेत ज्या दोन व्यक्तींनी गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या, त्यांच्याजवळ सुरक्षा पास होती. म्हैसूरच्या खासदाराच्या शिफारसीवरून ही पास देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळं विधान सभा आणि विधान परिषदेतील प्रेक्षक गॅलरीच्या आसपासही पोलिसांची संख्या वाढविण्यात आलीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपुरात हिवाळी अधिवेशन असल्यानं राज्यभरातून सुमारे 11 हजारांवर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा शहराच्या कानाकोपऱ्यात तैनात करण्यात आलाय. विधान भवनाकडे येणाऱ्या मार्गांपैकी सीताबर्डीकडून संविधान चौकाकडं येणारा मार्ग बंद आहे. रेल्वे स्थानक-गणेश टेकडीकडून झिरो माइल्स चौकाकडं येणारा मार्गही बंद ठेवण्यात आला. रेल्वे स्टेशनकडून कस्तूरचंद पार्क मार्गे संविधान चौकात येणारी वाहतूक संविधान चौकातून सदरकडे वळविण्यात आलीय.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आकाशवाणी चौक, संविधान चौक, नागपूर महापालिकेचे मुख्य द्वार, मीठानिम दर्ग्याचा परिसर येथे नाकाबंदी करण्यात आलीय. आकाशवाणी चौक आणि संविधान चौकातून येणे-जाणे करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस ताफाही तैनात करण्यात आलाय. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांनी दिल्लीतील घटनेनंतर पुन्हा एकदा बंदोबस्तासाठी तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. विधान भवनात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार येण्यापूर्वीच नियमाप्रमाणे सुरक्षेची तपासणी करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Edited by : Prasannaa Jakate

Security Step Up at Nagpur Vidhan Bhavan.
Nagpur Winter Session : 'सुशांत राजपूत, दिशा सालियन यांची हत्याच!'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com