नागपूर : आज विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला. मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई (Mumbai) ते अहमदाबाद (Ahamadabad) या रस्त्यांच्या दुरवस्थेवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडले आहे. यात १ टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे, तर बाकी ९ टप्प्यांचे काम राज्य सरकार करणार आहे. हा एकमेव मार्ग आहे की जो गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे. गोरी गणपतीसाठी चाकरमाने आता कोकणाकडे (Kokan) निघतील. खराब रस्त्यांमुळे त्यांची मोठी अडचण होणार आहे. या मार्गावरील १२००० ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. परशुराम घाटाची स्थिती अतिशय वाईट आहे, असे कोकणातल्या आमदारांनी सांगितले.
बोरीवलीच्या नॅशनल पार्कवर २ बाईकस्वारांचा डम्परचा धक्का लागून जाग्यावरच मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील अहमदाबाद हायवेवर मोठमोठे खड्डे आहेत. पावसाचे पाणी साचल्यावर कोणता खड्डा किती मोठा आहे, हे चालकाला कळत नाही. त्यामुळे रोजच अपघात होत आहेत. मी स्वतः तेथून जात असताना एका खड्ड्यात माझ्या गाडीचा टायर ब्रस्ट झाला. दैव बलवत्तर म्हणून वाचले, नाहीतर त्या दिवशी माझेही ‘राम नाम सत्य’ झाले असते, असे दहीसरच्या आमदार मनीषा चौधरी (Manisha Choudhari) म्हणाल्या. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे गाड्यांचे टायर पंचर होतात. खड्डे बुजवायला पाहिजेत. पण ते काम अद्यापही कुणी केले नाही. या रस्त्यावर दोन कंपन्यांचे टोल नाके आहेत. दोन्ही टोल कंपन्यांवर काय कारवाई करणार, असाही सवाल आमदार चौधरी यांनी केला.
अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबई - गोवा महामार्गाचे काम करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. पण त्यांचे सरकार गेले पण रस्त्याचे काम झाले नाही. ते तर सोडा खड्डेही बुजविण्यात आलेले नाहीत. या प्रश्नावर कोकणातील आमदार सातत्याने सभागृहात बोलत आहेत. यावर मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, हा रस्ता म्हणजे कुठे भुसभुशीत माती तर कुठे दगडांचा परिसर आहे. एका संस्थेसोबत सल्ला, चर्चा करून यावर उपाययोजना काढण्यात येत आहेत आणि लवकरात लवकर हे काम कसे पूर्ण होईल, याचे प्रयत्न आहेत. तरीही डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई-गोवा मार्गाचे पूर्ण होऊन, असे चव्हाण यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.