पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष कमी होताना दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाकडून धक्का देणारे निर्णय घेण्यात येत असतानाच प्रति शिवसेना भवन (shiv sena bhawan) उभारण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतला आहे. (shiv sena bhawan news update)
शिवसेनेचं मुंबईच्या दादर येथली छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ भव्य शिवसेना भवन आहे. या शिवसेना भवनावर आपला हक्क न सांगता शिंदे गटाने दादरमध्येच प्रति शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येत असल्याची वृत्त समोर आल्यानंतर आता पुण्यातही शिवसेना भवन उभारण्यात येत असल्याचे विश्वनीय सुत्रांनी सांगितले. लवकरच या भवनाची पूजा होणार आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या बालगंधर्व चौकाजवळ हे शिवसेना भवन होणार आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झालेले नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिली ही माहिती दिली.
पुण्यात डेक्कन परिसरात सध्या शिवसेनेचे कार्यालय आहे. सरकारच्या निर्णय जनतेपर्यंत पोहचावे यासाठी पुण्यातील हे कार्यालय महत्त्वाचे ठरणार असल्याचे भानगिरे यांनी सांगितले. नव्या सेनाभवनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता आहे.
बाळासाहेबांनी उभारलेलं शिवसेना भवन जे दादरमध्ये आहे, त्याच दादरमध्ये येत्या महिन्याभरात प्रति शिवसेना भवन उभारले जाणार आहे. तसेच प्रत्येक वार्डा वार्डात शिवसेनेच्या शाखा आहेत तशाच शाखा शिंदे गटाकडून उभारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी देखील नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.