Sudhir Mungantiwar and Nana patole

 

Sarkarnama

विदर्भ

आमदार मुनगंटीवार म्हणाले, नाना पटोलेंनी चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा...

सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांसोबत बसूनही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल तोडगा काढू शकतात. परंतु ते तसे करण्यापासून मुद्दाम स्वत:ला रोखत आहेत, असेही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी सभागृहात आमदार घोडेबाजार करतात, असा उल्लेख आज महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) केला. या बाबीचा त्यांनी निषेध व्यक्त केला. नाना पटोले दहा वर्षे भाजपमध्ये राहिले त्यांनी पक्षातील चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

विधानसभा अध्यक्षांची निवड सरकारला करायची आहे की नाही, असा सवाल आमदार मुनगंटीवार यांनी आज विधान सभेत उपस्थित केला. महाविकास आघाडीचे सरकार हे चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने मतदानाचा आग्रह ते करीत आहेत. सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांसोबत बसूनही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल तोडगा काढू शकतात. परंतु ते तसे करण्यापासून मुद्दाम स्वत:ला रोखत आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारजवळ धैर्य नाही. आवाजी पद्धतीने मतदान घेण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत गुप्त मतदान घेण्यात यावे, असे ते म्हणाले. आवाजी पद्धतीने मतदान घेण्याला प्रभारी अध्यक्षांनी परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीच्या मतदान पद्धतीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. आमदार मुनगंटीवारांची मागणीही तीच होती. यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार मुनगंटीवार यांच्यात जुंपली.

या सर्व प्रकारामुळे आज विधानसभा अध्यक्षांची निवड होऊ शकली नाही. पण या अधिवेशनात कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष निवडायचाच, असा कॉंग्रेसचा निर्धार आहे. त्या दिशेने पक्ष कामालाही लागला आहे. पण विरोधक त्यात अडथळे आणत आहेत. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही अडथळ्यांची शर्यत कशी पार करतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT